S M L

पीएमपीएमएलमुळे पुणेकर लटकलेले

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2013 10:44 PM IST

पीएमपीएमएलमुळे पुणेकर लटकलेले

05 जुलै : बसेसला लटकलेले पुणेकर, झालेली गर्दी हे पुण्यात नेहमीच दिसणारं चित्र... याला कारणीभूत आहे ती बसेसची कमी असलेली संख्या. पण नव्या बसेसची खरदी कायमच वादात सापडते. यावेळीही पीएमपीएमएल (PMPML)ने 500 बसेसची खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय.

पण ही खरेदी एकरकमी न करता टप्प्याटप्प्यांनी पैसे देण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे पीएमपीएमएलचं नुकसान होणार असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते संजय बालगुडे यांनी केलाय. पीएमपीएमएल या बस खरेदीसाठी साधारण प्रत्येक किलोमीटरमागे 10 रूपये मोजणार आहे.


यानुसार हिशेब केला तर जवळपास दुप्पट रक्कम पीएमपीया बसेससाठी मोजणार असल्याचं बालगुडेंचं म्हणणं आहे. मात्र पीएमपीचे संचालक प्रशांत जगताप यांनी मात्र हे आरोप खोडून काढले आहेत. पीएमपीला मुळातच जास्त बसेसची खरेदी करणं गरजेचं आहे. पीएमसी आणि पीसीएमसीनी ही रक्कम देण्यास नकार दिलाय. अजून किती रक्कम मोजायची याचा निर्णय झालेला नाही. त्याआधीच असे आरोप कशाच्या बळावर केले जातायत असा प्रश्न त्यांनी विचारलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2013 10:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close