S M L

पुण्यात आजपासून अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची धूम

Sachin Salve | Updated On: Jul 2, 2013 10:25 PM IST

पुण्यात आजपासून अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेची धूम

02 जुलै : 20 व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन्सशिप स्पर्धेला पुण्यात दिमाखदार उद्घाटन सोहळ्यानं सुरुवात झालीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. इंडियन ऍथलेटिक्स फेडरेशन आणि महाराष्ट्र सरकारनं फक्त 21 दिवसात या स्पर्धेची तयारी पूर्ण केली. चेन्नईनं या स्पर्धेचं यजमानपद नाकारल्यानंतर 12 जूनला महाराष्ट्र सरकारनं या स्पर्धेचं आव्हान स्वीकारलं. महाराष्ट्र सरकारनं या स्पर्धेसाठी 18 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या स्पर्धेत 45 देश सहभागी होणार असून 600 आंतरराष्ट्रीय ऍथलिट्सची कामगिरी पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळणार आहे.

आशिया ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप

- स्पर्धा - 3 जुलै ते 7 जुलै 2013


- सहभाग - 45 देश, 600 खेळाडू

- क्रीडा प्रकार - 42

- भारतीय पथक - 108 खेळाडू

Loading...
Loading...

----------------

भारताच्या अपेक्षा

महिला गट

  • सुधा सिंग - 300 मीटर
  • टिंटू लूका - 800 मीटर
  • कृष्णा पुनिया - थाळी फेक

-----------------------------

पुरुष गट

विकास गौडा - थाळी फेक

रणजित माहेश्वरी - ट्रीपल जम्प

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2013 10:24 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close