S M L

पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख निलंबित

Sachin Salve | Updated On: Jun 25, 2013 11:51 PM IST

पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख निलंबित

25 जून : पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख सोमनाथ परदेशी यांना निलंबित करण्यात आलंय. त्यांच्या जागी वैशाली जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेडिकल प्रॅक्टिशनर्स ऍक्ट नुसार वैद्यकीय सेवा देणार्‍या डॉक्टरांनी काँनिसिलची नोंदणी करणं बंधनकारक आहे.

मात्र डॉ. परदेशी यांची नोंदणी 1990 मध्ये रद्द झाली असतानाही ते सेवेत होते. माहितीच्या अधिकारात हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर रवी बर्‍हाटे यांनी परदेशींच्या विरोधात तक्रार केली. त्यांनतर त्यांना अटक करुन जामिनावर सुटका करण्यात आली होती. या बद्दलची माहिती असतानाही आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं 10 मे रोजी परदेशींची मुलाखत घेतली होती. पण कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन झाल्यांचं लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 25, 2013 09:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close