पराभूत सरपंचाने विहिरीत सोडले शौचालयाचे पाणी

पराभूत सरपंचाने विहिरीत सोडले शौचालयाचे पाणी

18 एप्रिलपुणे : राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती असताना एका माजी सरपंचाने पराभवाचा वचपा काढण्यासाठी विहिरीत शौचालयाचं दुषित पाणी सोडण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याजवळच्या खेड तालुक्यातल्या आहिरे गावात घडलाय. इथल्या एका माजी सरपंचानं निवडणुकीत पराभव झाल्याचा वचपा काढण्यासाठी चक्क विहिरीचं पाणीच दूषित करून टाकलं. चिधू भिमाजी अहिरे असं या माजी सरपंचाचं नाव आहे. अहिरे यांनी आपल्या शौचालयाचं पाणी आणि जनावरांच्या गोठ्यातलं सांडपाणी विहिरीत सोडून गावकर्‍यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ केलाय. गावात केवळ एकच विहीर असल्यानं गावकर्‍यांना हेच पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. सरपंच शांता अहिरे यांनी याबाबत खेडचे गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केलीय. पण, अजून कोणतीही कारवाई झालेली नाही.

  • Share this:

18 एप्रिल

पुणे : राज्यात भीषण दुष्काळ परिस्थिती असताना एका माजी सरपंचाने पराभवाचा वचपा काढण्यासाठी विहिरीत शौचालयाचं दुषित पाणी सोडण्याचा धक्कादायक प्रकार पुण्याजवळच्या खेड तालुक्यातल्या आहिरे गावात घडलाय. इथल्या एका माजी सरपंचानं निवडणुकीत पराभव झाल्याचा वचपा काढण्यासाठी चक्क विहिरीचं पाणीच दूषित करून टाकलं. चिधू भिमाजी अहिरे असं या माजी सरपंचाचं नाव आहे. अहिरे यांनी आपल्या शौचालयाचं पाणी आणि जनावरांच्या गोठ्यातलं सांडपाणी विहिरीत सोडून गावकर्‍यांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ केलाय. गावात केवळ एकच विहीर असल्यानं गावकर्‍यांना हेच पाणी पिण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. सरपंच शांता अहिरे यांनी याबाबत खेडचे गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केलीय. पण, अजून कोणतीही कारवाई झालेली नाही.

First published: April 18, 2013, 11:21 AM IST

ताज्या बातम्या