पुणेकरांना दिलासा, तारांगणाच्या बांधकामाला स्थगिती

पुणेकरांना दिलासा, तारांगणाच्या बांधकामाला स्थगिती

12 एप्रिलपुणेकरांना हायकोर्टाने दिलासा दिलाय. शहरात क्रीडांगणाच्या जागी तारांगणाच्या बांधकामाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. याबाबत बाजू मांडण्यासाठी एक आठवड्याची मुदत महापालिकेनं मागितली आहे. क्रीडांगणाच्या जागी तारांगण नको अशा आशयाची याचिका स्थानिकांनी दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने तारांगणाच्या बांधकामाला स्थगिती दिलीय. क्रीडांगणाच्या जागी तारांगण बांधण्याची संकल्पना नगरसेवक आबा बागुल यांची आहे. त्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेनं तयार केला. याला आक्षेप घेत स्थानिक नागरिकांनी कोर्टात धाव घेतली. यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली, तेव्हा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी बाजू स्पष्ट करण्यासाठी सात दिवसांची मुदत मागितली. ही मागणी मान्य करत हायकोर्टाने तोपर्यंत तारांगणाचं बांधकाम थांबवण्याचा निर्णय दिला.

  • Share this:

12 एप्रिल

पुणेकरांना हायकोर्टाने दिलासा दिलाय. शहरात क्रीडांगणाच्या जागी तारांगणाच्या बांधकामाला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. याबाबत बाजू मांडण्यासाठी एक आठवड्याची मुदत महापालिकेनं मागितली आहे. क्रीडांगणाच्या जागी तारांगण नको अशा आशयाची याचिका स्थानिकांनी दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने तारांगणाच्या बांधकामाला स्थगिती दिलीय. क्रीडांगणाच्या जागी तारांगण बांधण्याची संकल्पना नगरसेवक आबा बागुल यांची आहे. त्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेनं तयार केला. याला आक्षेप घेत स्थानिक नागरिकांनी कोर्टात धाव घेतली. यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली, तेव्हा महापालिकेच्या अधिकार्‍यांनी बाजू स्पष्ट करण्यासाठी सात दिवसांची मुदत मागितली. ही मागणी मान्य करत हायकोर्टाने तोपर्यंत तारांगणाचं बांधकाम थांबवण्याचा निर्णय दिला.

First published: April 12, 2013, 1:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या