त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सोयीचा रंगवला - शरद पवार

त्यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास सोयीचा रंगवला - शरद पवार

जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांची प्रतिमा मुस्लिमविरोधी म्हणून रंगवल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी केलाय.

  • Share this:

21 जून : शरद पवारांनी आता इतिहास पुनर्लेखनाच्या वादातही उडी घेतलीय. ज्यांच्याकडे ज्ञानाची मक्तेदारी होती त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी सोयीचा इतिहास रंगवला, जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांची प्रतिमा मुस्लिमविरोधी म्हणून रंगवल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी केलाय.

छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाणारे दूरदृष्टीचे जगातील अद्वितिय नेते होते, त्यांचं राज्य हे भोसल्यांचं राज्य नव्हतं तर रयतेचं राज्य होतं. परंतु शिवाजी महाराज हे मुस्लीम विरोधी होते,केवळ हिंदूंचे राजे होते.गोब्राम्हण प्रतिपालक होते अशी चुकीची प्रतिमा रंगवली गेली अशी टीका शरद पवार यांनी केली.

कोकाटे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सचित्र इतिहास या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यात करण्यात आलं. याच कार्यक्रमात पवारांनी हे गंभीर आरोप केलेत.

First published: June 21, 2017, 1:40 PM IST

ताज्या बातम्या