• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राहुल गांधींनी पुण्याच्या ईशाला दिली लोकसभेची ऑफर
  • VIDEO: राहुल गांधींनी पुण्याच्या ईशाला दिली लोकसभेची ऑफर

    News18 Lokmat | Published On: Apr 5, 2019 12:16 PM IST | Updated On: Apr 5, 2019 12:26 PM IST

    पुणे, 05 एप्रिल: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यातील हडपसर येथे 5 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी केले. एका महाविद्यालयीन युवतीने राजकारणातील महिलांच्या सहभागाबाबत प्रश्न विचारला. त्यावर राहुल गांधी यांनी महिलांना लोकसभा व प्रत्येक विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. त्याच बरोबर प्रश्न विचारणाऱ्या युवतीला राजकारणात येण्याचे आवाहन केले. राजकारणाची आवड असेल तर माझ्याशी चर्चा करा आम्ही तुम्हाला लोकसभा अथवा विधानसभेची संधी देऊ, असे राहुल म्हणाले. त्याआधी प्रश्न विचारण्यासाठी सुबोध याने युवतीला बोलवताना मला थोडी लाज वाटते असे सांगितले. कारण त्या मुलीचे नाव ईशा होते. सुबोध भावेच्या 'तुला पाहते रे या' या मालिकेतील अभिनेत्रीचे नाव ईशाच असल्याचे सुबोधने राहुल गांधींना सांगितले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी