पुण्यासाठी महत्त्वाची बातमी! अतिरिक्त निर्बंध झाले शिथिल पण...

पुण्यासाठी महत्त्वाची बातमी! अतिरिक्त निर्बंध झाले शिथिल पण...

काही भागात गेले दोन दिवस फक्त दूध आणि औषधंच मिळत होती. कोणत्या भागातले निर्बंध शिथिल झाले याची सविस्तर माहिती

  • Share this:

पुणे, 23 एप्रिल: पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत गेले तसतसा शहराचा काही भाग सील करण्यात आला. तरीही उर्वरित भागात पुणेकरांनी लॉकडाऊनचे निर्बंध न पाळल्याने कोरोनाबाधितांमध्ये सातत्याने वाढ होत होती. दोन दिवसांपूर्वी अनेक भागांमध्ये (Coronavirus Pune seal) त्यामुळे अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले.  22 आणि 23 एप्रिलला पुण्याचा मध्यभाग आणि इतर बराच भाग त्यामुळे कडकडीत बंद होता. हे निर्बंध उद्यापासून थोडे शिथिल होणार आहेत, पण 20 तारखेपूर्वी होते तसे निर्बंध कायम राहणार आहेत.

पुण्याचा काही भाग 7 एप्रिल आणि 14 एप्रिलला सील (Pune areas seal) केला तिथं अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या सेवा सकाळी 10 ते 12 या दोनच तासांसाठी सुरू राहतील. मात्र 20 एप्रिल नंतर जो भाग सील (प्रतिबंधित ) केला त्या भागात ही सेवा 10 ते 2 अशी 4 तास खुली राहतील.

कुठला भाग आहे प्रतिबंधित?

समर्थ पोलीस ठाणे, कोंढवा, खडक,फरासखाना पोलीस हद्दीतील पूर्ण भाग गेले दोन दिवस अतिरिक्त निर्बंधाखाली होता.

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या पुणेकर तरुणांना मुस्लीम कुटुंबाने दिला आसरा

शिवाय स्वारगेट,दत्तवाडी, बंडगार्डन, खडकी, वानवडी, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही भागही रुग्णसंख्या वाढल्याने अतिरिक्त निर्बंधाखाली होता.

कोणत्या भागात फक्त दूध आणि औषधे मिळणार?

परिमंडळ एक

-समर्थ, खडक आणि फरासखाना पोलिस ठाण्याच्या अखत्यारित येत असलेला संपूर्ण परिसर.

परिमंडळ दोन

-स्वारगेट  पोलिस ठाणे - गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लाॅट

-बंडगार्डन पोलिस ठाणे- ताडीवाला रस्ता

परिमंडळ तीन

-दत्तवाडी पोलिस ठाणे- जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शन

परिमंडळ चार

-येरवडा पोलिस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ

-खडकी पोलिस ठाणे- खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टी

परिमंडळ पाच

-कोंढवा पोलिस ठाण्याचा संपूर्ण भाग

-वानवडी पोलिस ठाणे- विकासनगर, सय्यदनगर, रामटेकडी,चिंतामणी नगर, वॉर्ड क्रमांक २४, हांडेवाडी, वॉर्ड क्रमांक २६ आणि २८.

पुणे विभागातली रुग्णसंख्या 1000 पार

पुणे विभागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 हजार 31 झाली असून विभागात 172 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पुणे विभागात - पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर आणि सातारा परिसराचा समावेश होतो.

3 वर्षांची मुलगी ते 92 वर्षांची आजी, पुण्यात एकाच कुटुंबातले 15 जण झाले बरे

या विभागात अॅक्टीव रुग्ण 794 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकूण 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 13 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 1 हजार 31 बाधित रुग्ण असून 65 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 936 बाधीत रुग्ण असून 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 21 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 37 बाधीत रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 27 बाधीत रुग्ण असून  एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर  जिल्हयात 10 बाधीत रुग्ण आहेत.

आजपर्यत विभागामध्ये एकुण  11 हजार 707 नमूने तपासणीसाठी पाठविणेत आले होते त्यापैकी 11 हजार 46 चा अहवाल प्राप्त झाल असून  662 नमून्यांचा अहवाल  प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  9 हजार 964 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 31 चा अहवाल  पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 47 लाख 51 हजार 802 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 1 कोटी 82 लाख 71 हजार 857 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 927 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

कोरोना योद्ध्यांवरील संकट कायम, 24 तासांपूर्वी पॉझिटिव्ह आलेली नर्स उपचाराविना

First published: April 23, 2020, 9:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading