26 मार्च : पुण्यात पणन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचं उदघाटन झालं. यंदा एकूण आंबा उत्पादन 4 लाख 23 हजार 432 मेट्रिक टन झालं असून, यावर्षी राज्यातून ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि इराण या तीन नवीन देशांना आंबा निर्यात केल जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली.
आंब्याप्रमाणेच इतर फळांसाठी देखील महोत्सव आयोजित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. रासायनिक पद्धतीनं आंबा पिकवताना घातक रसायनांचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंबंधी आपण सतर्क असल्याचं त्यांनी सांगितलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा