S M L

पुणे दौंड लोकलला अखेर मुहूर्त मिळाला

Samruddha Bhambure | Updated On: Mar 25, 2017 08:20 PM IST

पुणे दौंड लोकलला अखेर मुहूर्त मिळाला

अद्वैत मेहता, पुणे

गेले काही माहिने उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणे-दौंड लोकल ट्रेनला अखेर मुहूर्त मिळाला.रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी कोल्हापुरातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे-दौंड या डेमू ट्रेनचं उदघाटन केलं. अनेक वर्षांची प्रवाशांची मागणी पूर्ण झाली. पुणे-लोणावळा या मार्गावरील लोकल ट्रेनप्रमाणे पुणे-दौंड रेल्वे मार्गावरही लोकल ट्रेन सुरू अशी मागणी गेली अनेक वर्षे प्रलंबीत होती. विशेषत: या मार्गावरील विद्युतीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर विजेवर चालणारी लोकल ट्रेन सेवा सुरु होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात डिझेल मल्टिपल युनिट अर्थात डेमू सुरू झाली. काही का असेना आता चेंगराचेंगरी न होता प्रवास करता येईल यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केलाय.

सध्या या डेमुच्या रोज 4 फेऱ्या होणार आहेत.पुण्याहून सकाळी 10.30 आणि दुपारी 2.20 ला डेमू दौंडकरता निघेल आणि दौंडहून दुपारी 12.43 आणि 4.18 मिनीटांनी पुण्याला परत निघेल. ही ट्रेन भविष्यात बारामतीलाही जाणार आहे आणी भिगवण इंदापूर पर्यंत नेण्यात यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.अनिल शिरोळे हेही कार्यक्रमाला हजर होते.

या कार्यक्रमावेळो राष्ट्रवादी आणि भाजप च्या कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करत श्रेय घेण्याच्या घोषणाही दिल्याने काही काळ गोंधळ ही पाहायला मिळाला. आता अपेक्षा हीच आहे की दौंड हून पुण्याला up down करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीनुसार या।लोकलच्या वेळा असाव्यात आणि लवकरच विजेवर धावणारी ट्रेन सुरु व्हावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 25, 2017 08:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close