S M L

'मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे'चा प्रवास महागणार; टोलमध्ये 35 रूपयांनी वाढ

Samruddha Bhambure | Updated On: Mar 23, 2017 11:31 AM IST

Mumbai PuneToll

23 मार्च : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल दरांमध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या 1 एप्रिलपासून एक्स्प्रेस वेवरून प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी 25 रूपये अधिक मोजावे लागणार आहेत.

म्हणजे,  ज्या वाहनधारकांना सध्या 195 रुपये टोल द्यावा लागतो, त्यांना 1 एप्रिलपासून 230 रुपये मोजावे लागतील.

दर तीन वर्षांनी एक्स्प्रेस वेवरील टोलमध्ये 18 टक्क्यांनी वाढ केली जाईल, अशी अधिसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाने 2004 मध्येच काढली होती, असं सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

त्यामुळे या नियमानुसार आता यामध्ये 35 रूपयांची वाढ होऊन हलक्या वाहनांसाठीचे टोलचा दर 230 रूपयांवर पोहचणार आहे. दर तीन वर्षांनी 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू केली जाते. यापूर्वी २०११ मध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोलचे दर वाढवण्यात आले होते.

Loading...
Loading...

 प्रवाशांवर टोलधाड

प्रवाशांवर टोलधाड

जुने दर

नवे दर

चार चाकी

195 रू.

230 रू.

मिनी बस

300 रू.

355 रू.

ट्रक

418 रू.

493 रू.

बस

572 रू.

675 रू.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 23, 2017 09:13 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close