'उडता पुणे',अमली पदार्थ विक्रीचे दोन महिन्यात तब्बल 20 गुन्हे !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 22, 2017 08:12 PM IST

'उडता पुणे',अमली पदार्थ विक्रीचे दोन महिन्यात तब्बल 20 गुन्हे !

drugs_pueवैभव सोनवणे,पुणे

22 मार्च : पुण्याची व्याप्ती वाढत असताना विद्येचं माहेरघर असलेल्या या शहरात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी राहताहेत. हे विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकताहेत की काय अशी स्थिती निर्माण झालीये. या वर्षाच्या सुरुवातीपासून दोन महिन्यातच अमली पदार्थ विक्रीचे तब्बल २० गुन्हे उघडकीस आले आहेत. आजही पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने साडेबारा लाख रुपयाचं तब्बल पाच किलो अफिम जप्त केलंय ते विक्रीसाठी राजस्थानहून आलेल्या तीन जणांना पोलिसांनी अटक केलीये.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि अमली पदार्थ विरोधी पथकांसह इतरही शाखांनी अमली पदार्थाच्या विक्रीवर लक्ष्य केंद्रित केलंय. शहरात शिक्षणाच्या निमित्ताने येणारे अनेक विद्यार्थी हे अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांचं प्रमुख लक्ष्य आहेत. गेल्या काही दिवसात वेगवेगळे ड्रग्स विक्रीची वाढ झाल्याची माहिती पुणे पोलिसांना होती. त्यानुसार अमली पदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी मोठी आघाडी उघडलीये. सलग दोन दिवस पोलिसांनी मोठी कारवाई करत ४ लाख रुपयाचे मेफोड्रेन आणि साडे बारा लाख रुपयाचा अफिम जप्त केलंय ता दोन्ही प्रकरणात मिळून ६ आरोपी अटक आहेत.

२०१५ आणि २०१६ या दोन्ही वर्षात अमली पदार्थ विक्रीचे ६० च्या आसपास गुन्हे

यंदा पहिल्या दोनच महिन्यात तब्बल २० गुन्ह्यांची नोंद

Loading...

२० गुन्ह्यांमध्ये जवळपास ४५ आरोपी अटक

कोट्यवधी रुपयाचे अमली पदार्थ जप्त

अमली पदार्थाच्या या विक्रीत महागड्या अमली पदार्थांचा ही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. खासकरून होळी आणि धुळवडीच्या काळात या अमली पदार्थाना मागणी वाढत असल्याने त्याची विक्री करणारे ड्रॅग पेडलर ही मोठ्या संख्येने कार्यरत होतात त्यांची योग्य वेळी माहिती मिळत गेल्यानेच पोलीस हे अमली पदार्थाचं रॅकेट उध्वस्त करू शकले.

अमली पदार्थांच्या या कारवाया म्हणजे केरातलं मुसळ असण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्याप्रमाणावर पकडले गेलेले अमली पदार्थ यापेक्षा मोठ्या प्रमाणात विकले गेले असल्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून कळतेय. अनेकदा तर बाकीचे अमली पदार्थ आरामशीर विकले जावेत म्हणून थोड्या कारवाया ही करू दिल्या जातात. त्यामुळे हे रॅकेट मुळापासून उखडून टाकण्याची गरज आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 22, 2017 08:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...