पिंपरी-चिंचवडच्या प्राणी संग्रहालयातल्या 8 मगरी गेल्या कुठे?

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 17, 2017 07:02 PM IST

पिंपरी-चिंचवडच्या प्राणी संग्रहालयातल्या 8 मगरी गेल्या कुठे?

pimpri_chincwad

17 मार्च : पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे चालवल्या जाणाऱ्या प्राणी संग्रहालयातील तब्बल 8 मगरी गायब झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.पिंपरी शहरातील आकुर्डी परिसरात असलेल्या बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानातला हा धक्कादायक प्रकार आहे.

या उद्यानात एकूण 16 मगरी होत्या.त्यापैकी मागल्या वर्षी जन्मलेल्या चार मगरींच्या पिलांची चोरी झाली आणि आणखी 4 मगरींचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या मुख्य अभिरक्षकांनी दिलीय.मात्र मृत्यू झालेल्या मगरींचा कोणत्या कारणाने मृत्यू झाला आणि ज्या 4 मगरी चोरीला गेल्या त्यासाठी नेमकं कोण जबाबदार आहे याची माहिती अधिकारी देऊ शकलेले नाहीयत.त्यामुळे या प्रकरणातलं गूढ वाढलंय.

धक्कादायक बाब म्हणजे चोरी गेलेल्या किंवा मृत पावलेल्या मगरी या शेड्युल वन म्हणजे अति दुर्मिळ प्राण्यांच्या यादीमध्ये येत असल्याने या सर्व प्रकरणाचा संबंध थेट केंद्र शासनाशी येतो.त्यामुळे आता केंद्र आणि राज्याचे वन अधिकारी त्याच बरोबर झु ऑथोरिटी विभाग या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेतात हे पाहावं लागणाराय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2017 06:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...