S M L

खडकवासलामध्ये चार ट्रक जाळले

Sachin Salve | Updated On: Mar 16, 2017 04:31 PM IST

खडकवासलामध्ये चार ट्रक जाळले

16 मार्च : पुणे शहरात वाहने जाळण्याच्या घटना वारंवार घडत असतात. आता दुचाकीनंतर चारचाकींना लक्ष्य करण्यात आलंय. खडकवासला इथं बुधवारी मध्यरात्री चक्क चार ट्रक जाळण्याची घटना घडलीय.

खडकवासला गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप मते-पाटील यांचे सर्व चार ट्रक जाळून टाकण्यात आलेत. मते यांची सिमेंट विक्रीची एजन्सी आहे. आगीत जीवितहानी झालेली नसली तरी चारही ट्रक पूर्ण जाळून खाक झाल्याने सुमारे एक कोटी रुपयांचं नुकसान झालंय.

आग लागली त्यावेळी मते यांच्या घरातील सर्वजण झोपले होते. आग लागल्यानंतर आवाजामुळे ते जागे झाले. सिंहगड रस्त्यावरील अग्निशमक दलास माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, डिझेलमुळे आगीचे लोट मोठे होते. ट्रक रोज दुसऱ्या जागेवर उभे करीत होते. परंतु शिवजयंतीचा दोन दिवस कार्यक्रम असल्याने नेहमीच्या जागेऐवजी बंगल्याच्या शेजारी 40-50 फुटांवर ते उभे केले होते. रात्री अडीच ते पाउणेतीन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच जण आले त्यांनी ते ट्रक जाळले असं मते यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 16, 2017 04:31 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close