पुण्याच्या महापौरपदी पहिल्यांदाच भाजपच्या मुक्ता टिळक यांची निवड

पुण्याच्या महापौरपदी पहिल्यांदाच भाजपच्या मुक्ता टिळक यांची निवड

  • Share this:

Pune mayor

15  मार्च : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मुसंडी मारून सत्ता काबीज करणाऱ्या भाजपसाठी आजचा दिवस ऐतिहासिक म्हणावा लागेल. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर झाला आहे. महापौरपदी मुक्ता टिळक यांची निवड झाली आहे. त्यांना 98 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार नंदा लोणकर यांना 52 मतं मिळाली. यावेळी शिवसेनेने तटस्थ राहणं पसंत केलं.

पुण्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर आणि उपमहापौर विराजमान होणं निश्चित होतं. 162 पैकी भाजपचे 98 नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादीला 40, काँग्रेसला 11, शिवसेनेला 10, मनसेला दोन जागा मिळवण्यात यश आलं आहे.

भाजपकडून मुक्ता टिळक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नंदा लोणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर शिवसेनेकडून संगीता ठोसर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी आज सकाळी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेत, मुक्ता टिळक यांना मतदान न करता तटस्थ राहणेच पसंत केलं. तर मनसेच्या दोन नगरसेवकांनी निवडणुकीवर बहिष्कार घातला. एमआयएमच्या नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी राष्ट्रवादीच्या महापौरपदाच्या उमेदवार नंदा लोणकर यांना मतदान केलं.

दरम्यान, महापौरपदी विराजमान झालेल्या मुक्ता टिळक यांचे खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, पालकमंत्री गिरीश बापट, माजी महापौर प्रशांत जगताप, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, गटनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार यांनी अभिनंदन केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 15, 2017, 2:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading