S M L

पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान

Sachin Salve | Updated On: Mar 14, 2017 05:52 PM IST

पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर विराजमान

14 मार्च : पिंपरी चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे नगरसेवक नितीन काळजे यांची निवड झालीय. तर शैलजा मोरे यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे. या दोघांचीही निवड बिनविरोध झालीय. विशेष म्हणजे पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा महापौर विराजमान झालाय.

पिंपरी चिंचवडमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी नंतर अखेर भाजपचा पहिला महापौर विराजमान झालाय. आज झालेल्या निवडणुकीत नितिन काळजे आणि शैलजा मोरे हे दोघेही महापौर उपमहापौरपदी विराजमान झाले.

 

विशेष म्हणजे या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतली. आणि भाजप चे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पूर्णपणे नेस्तनाबूत करून आज खऱ्या अर्थाने भाजप ने पिंपरी महापालिकेवर आपली सत्ता काबिज केलीये.

 

Loading...
Loading...

 

मात्र असं जरी असलं तरी आजही भाजप मधील अंतर्गत गटबाजीच दर्शन घडलंच. नवनिर्वाचित महापौर हे आमदार महेश लांडगे यांच्या गटातील असल्याने निवड प्रक्रियेपासून ते लांडगे सोबतच होते तर ही महापौरपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून केवळ आमदार महेश लांडगे यानी प्रयत्न केल्याचं बघायला मिळालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 14, 2017 05:34 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close