10 सीसीटीव्ही आणि 10 बाऊन्सर्स ; पुण्यात महिलांसाठीच खास रंगोत्सव

 10 सीसीटीव्ही आणि 10 बाऊन्सर्स ; पुण्यात महिलांसाठीच खास रंगोत्सव

  • Share this:

pune_holi

13 मार्च : धुळवडीच्या कार्यक्रमात अनेकदा महिलांच्या छेडछाडीच्या घटनाही घडतात. मात्र असे प्रकार टाळण्यासाठी पुण्यातील धानोरी परिसरात एका खास धुळवड़ीच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

धानोरीच्या नगरसेविका रेखा टिंगरे यांनी दहा सीसीटीव्ही कँमेरे आणि दहा बाऊन्सर्सच्या माध्यमातून नैसर्गिक रंगाचा होळी रंगोत्सव आयोजित केला होता. याठिकाणी फक्त महिला, मुलींनाच प्रवेश देण्यात आला होता.

तसंच महिलांची छेडछाड होऊ नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले होते. कडेकोट सुरक्षाव्यवस्था असल्याने महिलांनी आणि तरुणींने डीजेच्या तालावर ठेका धरत आणि मनसोक्तपणे नैसर्गिक रंगाची उधळण करत धुळवड साजरी केली. रेखा टिंगरे यांनी कोरडी पर्यावरणपूरक अशी ही धूळवड आयोजित केल्याने महिलांनी त्यांचं कौतुक केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 13, 2017 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...