S M L

फक्त 2 हजारांसाठी मनोरुग्णाला विकलं

Sachin Salve | Updated On: Mar 10, 2017 09:26 PM IST

फक्त 2 हजारांसाठी मनोरुग्णाला विकलं

10 मार्च : चक्क २ हजार रूपयांसाठी रहीमान जखाते या ५४ वर्षीय व्यक्तीला विकण्याची धक्कादायक घटना पुण्यातील शिरुर इथं घडलीये.

रहीमान जखाते हे शिरूर तालुक्यातील कुरूळी येथील रहिवाशी  आहेत. जखाते हे भोळसर स्वभावाचे मनोरुग्ण असून त्यांना आरोपी संतोष टुले, शंभू चव्हाण आणि  सुधाकर भोसले या तिन आरोपींनी जखाते यांना फसवून येळपणे जिल्हा अहमदनगर येथे वेट बिगारी कामासाठी चक्क २ हजार रूपयांना विकले.

याप्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या ८ दिवसात आरोपींना अटक केली आणि जखाते यांची सुखरूप सुटका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 10, 2017 09:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close