09 मार्च : ज्येष्ठ नाट्यसमीक्षक वि.भा.देशपांडे यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. ते 79 वर्षांचे होते.
नाटकात करियर करू पाहणाऱ्या आणि नाटकाचा अभ्यास करणाऱ्या सर्वांचे गुरु म्हणजे वि.भा. देशपांडे.फक्त ज्येष्ठ नाट्यासमीक्षक ही त्यांची ओळख नसून एक मार्गदर्शक म्हणूनही ते सगळ्यांचे लाडके विभा सर होते.नाट्यमंडळींसाठी तर त्यांचं मार्गदर्शन नेहमीच लाख मोलाचं राहिलंय.
एम.ए.पीएचडी झाल्यानंतर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली.नाट्यशास्त्राचे गाढे अभ्यासक तर ते होतेच पण जुन्या नाटकांवरची त्यांनी लिहिलेली पुस्तकं आजही नाटकाच्या अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात.
स्वतंत्र आणि संपादित अशी त्यांची ४३ पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.त्यातली महत्त्वाची काही पुस्तकं -
१ . मराठी नाट्यकोश
२ . मराठी नाटक
३ . रंगयात्रा
४ . आचार्य अत्रे प्रतिमा आणि प्रतिभा
५ . पु.ल. पंच्याहत्तरी
६ . गाजलेल्या रंगभूमिका
७ .मराठी कलाभिरुची
१० .माझा नाट्यलेखन-दिग्दर्शनाचा प्रवास
११ .नाटक नावाचं बेट
१२ .निळू फुले (व्यक्ती, कार्यकर्ता, कलावंत) संपादन
१३ .नाट्यमित्र (लेखसंग्रह)
३१ मे १९३८ पुण्यात जन्मलेल्या डॉ. वि.भा. देशपांडे यांना विविध प्रकारच्या १६ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होत.
विभांची ही एक्झिट मराठी नाट्यशसृष्टीसाठी चटका लावून जाणारी ठरलीये.पण त्यांच्या लेखनातून एक मार्गदर्शक, एक उत्तम दिग्दर्शक म्हणून ते नेहमीच आपल्या सोबत राहतील.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा