एक्स्प्रेस वे टोल प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंविरोधात एसीबीकडे तक्रार

एक्स्प्रेस वे टोल प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंविरोधात एसीबीकडे तक्रार

  • Share this:

fadanvis_and_Shinde08 मार्च : मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोलधाडीविरोधात टोल अभ्यासक आक्रमक झालेत. सरकारवर ठेकेदारधार्जिणेपणाचा आरोप करीत टोल अभ्यासकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एसीबीत तक्रार दाखल केलीये.

मुंबई पुणे एक्स्प्रेसवर कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे ठरलेली टोल वसुली रक्कम नोव्हेंबर 2016 मधेच वसूल झाली आहे. त्यामुळे टोल वसुली तातडीने थांबवावी अशी मागणी टोल अभ्यासकांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून देखील उत्तर मिळत नसल्याचा आरोप टोल अभ्यासकांनी केला.

अखेरीस या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एसीबीत तक्रार दाखल केलीये. याशिवाय एमएसआरडीचे सहसंचालक राधाकृष्ण मोपलवार यांच्याविरोधातही तक्रार दाखल करण्यात आलीये. नोव्हेंबर 2016 मध्ये एक्स्प्रेस हायवेच्या टोलची रक्कम वसूल झालीये. त्यामुळे टोल तातडीनं बंद करावा अशी मागणी केली जातेय. मुख्यमंत्र्यांचं पारदर्शीपणाचं धोरण हे सोयीनुसार असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2017 08:38 PM IST

ताज्या बातम्या