पुणे पालिकेवरही उपलोकायुक्त नेमावा, अनिल शिरोळेंचा भाजपला घरचा अहेर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Mar 6, 2017 08:57 PM IST

पुणे पालिकेवरही उपलोकायुक्त नेमावा, अनिल शिरोळेंचा भाजपला घरचा अहेर

anil_shirole06 मार्च : मुंबईप्रमाणेच पुणे महानगरपालिकेचा कारभारही पारदर्शक व्हावा, यासाठी पुणे पालिकेवरही उपलोकायुक्त नेमण्याची मागणी पुण्याचे भाजप खासदार अनिल शिरोळे यांनी केलीय.

स्थायी समितीत चालणाऱ्या टक्केवारीला आणि ठेकेदारीला आळा बसावा याकरीता हा मार्ग वापरावा असं खासदार शिरोळेंना वाटतंय. विशेष म्हणजे पुणे पालिकेत भाजप स्वबळावर सत्तेत आलीये. त्यामुळे स्थायी समितीचं अध्यक्षपदही भाजपकडेच राहणार आहे. अशात उपलोकायुक्ताची मागणी करून खासदार शिरोळेंनी स्वपक्षीयांनाच खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा पुण्यात सुरू झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2017 08:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...