हडपसरमध्ये गुंडांचा धुमाकूळ, सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद

हडपसरमध्ये गुंडांचा धुमाकूळ, सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद

  • Share this:

Pune2131

06 मार्च : हडपसरमध्ये पूर्ववैमनस्यातून गुंडांच्या टोळक्याने एकाला जबर मारहाण केली आहे. मारहाणीबरोबरच परिसरात दहशत माजवून या गुंडांनी चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी वाहनांचीही तोडफोड केली.

रविवारी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून लहान मुले आणि महिलांची जीव वाचवण्यासाठी धांदल उडाली.

दरम्यान, या प्रकरणी मारहाण, गाड्यांची तोडफोड आणि दहशतीचं वातावरण निर्माण करणं या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2017 02:17 PM IST

ताज्या बातम्या