शबा शेख अपघात प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाटच

शबा शेख अपघात प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाटच

  • Share this:

वैभव सोनावणे, पुणे

05 मार्च : पोलीस म्हणजे न्यायाचे रक्षणकर्ते. पण यावर विश्वास नाही बसत. पुण्यात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलानं एका मुलीला उडवलं. 26 तारखेला ही भयानक घटना घडली होती. पण अजूनही आरोपी अभिमन्यू जगताप मोकाटच आहे. पोलीस म्हणतात गरज पडली तर अटक करू.

जिला उडवलं ती आहे पुण्याची शबा शेख. गाडी चालवणारा अभिमन्यू जगताप. येरवडा जेलचे वरिष्ठ अधिकारी प्रदीप जगताप यांचा मुलगा. मग काय, अभिमन्यू अजूनही पोलिसांच्या चक्रव्यूहात अडकलेला नाही..  डीसीपी डॉ. प्रवीण मुंढे म्हणतात, गरज पडली तर अटक करू.

Pune aroopi

यावर काही सवाल उपस्थित होतायेत.

- डीसीपी म्हणतात, गरज पडली तर अटक करू. याचा नेमका अर्थ काय?

- अटक करून चौकशी करता येत नाही का?

- पोलीस नक्की कोणती कारवाई करतायत, हे जनतेला कळेल का?

- पोलीस अधिकाऱ्यांचा मुलांना वेगळे कायदे लागू होतात का?

- २६ तारखेपासून पुणे पोलीस काय करतायेत?

- शबाच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या कथित धमक्यांचं काय?

अपघातग्रस्त शबा शेख जहांगीर रुग्णालयात मृत्यूशी झुंज देतेय.. तिला १६ हेअरलाईन फ्रॅक्चर्स आहेत, आणि अजून ५ शस्त्रक्रिया तिच्यावर होणार आहे.

शबाला न्याय मिळालाच पाहिजे. आपल्याकडे गाडी आहे, आणि वडिल पोलिसांत म्हणजे लोकांना उडवायचा लायसन्स मिळत नाही. आता अभिमन्यूला अटक होईपर्यंत आयबीएन लोकमत याचा पाठपुरावा करतच राहील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: March 5, 2017, 3:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading