गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ उद्या संपणार ; नवीन कोण येणार?

गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ उद्या संपणार ; नवीन कोण येणार?

  • Share this:

gajendra_chavan403 मार्च : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयमध्ये ज्यांच्या नियुक्तीवरून विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते, त्या गजेंद्र चौहान यांचा कार्यकाळ शनिवारी संपत आहे. त्यामुळे चौहान संस्थेचे अध्यक्ष नसतील.

चौहान यांनी विद्यार्थ्यांचा प्रचंड विरोध डावलून आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदासाठी चौहान यांना केंद्र सरकारने अद्याप मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे त्यांची जागा कोण घेणार किंवा त्यांची मुदत वाढणार का, याकडे संस्थेच्या सर्व घटकांचे लक्ष लागले आहे.

फिल्म इन्स्टिट्यूटच्या सोसायटीचे तसंच संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून केंद्र सरकारने चौहान यांची तीन वर्षांसाठी निवड केली होती. विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे चौहान यांना संस्थेत पाऊल टाकणेही अवघड झाले होते. विद्यार्थ्यांच्या विरोधाला न जुमानता गजेंद्र चौहान यांनी सूत्र स्वीकारली होती. आता गजेंद्र चौहान यांच्या जागी कोण येणार याकडे सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 3, 2017 03:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...