S M L

अंतराळवीर व्हायचं तर काय करू?,आयुकात भरली विज्ञान जत्रा

Sachin Salve | Updated On: Feb 28, 2017 07:15 PM IST

अंतराळवीर व्हायचं तर काय करू?,आयुकात भरली विज्ञान जत्रा

aiuka2अद्वैत मेहता, पुणे

28 फेब्रुवारी : 28 फेब्रुवारी अर्थात विज्ञान दिन. गेली काही वर्षे पुण्यातल्या एनसीएल,आयुका, आयएसईआर अशा विविध वैज्ञानिक संस्थांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होतो. अक्षरश; हजारो शालेय विद्यार्थी आणि त्यांचे पालक या दिनानिमित्त या संस्थांमध्ये गर्दी करतात. कारण, ओपन हाऊस किंवा ओपन डे हा उपक्रम.

आयुकामध्ये या वर्षी सुमारे 5 हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली. विविध विज्ञान प्रकल्प पाहणे, त्यांची माहिती घेणे, वैज्ञानिक प्रयोग पाहणे, अरिस्टोटल,आर्किमिडीज, न्यूटन,गॅलिलीओ यांच्या प्रतिमा, शिल्पांसोबत सेल्फी काढणे यात मुलं हरवून गेली होती. एखाद्या मंदिर किंवा देवळाबाहेर रांग लागणं यात नवीन काही नाही. पण आयुकामध्ये विज्ञान दिनी प्रवेश मिळावा म्हणून रांगा लागणं हे सुखावणारं चित्र आहे. सर्वात मोठं आकर्षण होते ते म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि ज्यांच्या संकल्पनेतून आयुकाची निर्मिती झाली त्या जयंत विष्णू नारळीकर या श्रेष्ठ शास्त्रज्ञाशी प्रश्न उत्तरं करण्याची विद्यार्थ्यांना मिळालेली संधी.

चंद्रशेखर सभागृह खचाखच भरलं होतं आणि अंतराळवीर व्हायचं तर काय करू?? शास्त्रज्ञ होणं म्हणजे नेमकं काय? भारताच्या मंगळयान मोहिमेचं वेगळे पण काय तसंच तुमची नवी विज्ञान कथा कादंबरी कधी येणार आहे. अशा कुतुहुलपूर्ण प्रश्नांची सरबत्तीच नारळीकर यांच्यावर मुलं करत होती आणि नारळीकर सर सोप्या सहज रीतीने हे कुतुहुल शमवत होते.

शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांचं कुतुहुल, वाढता वैज्ञानिक दृष्टीकोन हा आशादायी,दिलासादायी आहे असं सांगतानाच नारळीकर यांनी सरकार मात्र उदासीन आहे. जीडीपीच्या 2 टक्के पण निधी आपण विज्ञानावर खर्च  करत नाही. याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

Loading...
Loading...

एकंदरीत विज्ञान दिनानिमित ओपन हाऊस कल्पना हिट ठरली आहे. दरवर्षी ही विज्ञान जत्रा फुलत आहे. घरोघरी विज्ञानेश्वर तयार व्हायचे असतील आणि जय जवान जय किसान आणि जय विज्ञान ही घोषणा प्रत्यक्षात आणायची असेल तर सरकार नेही उदासीनता झटकून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या करता सक्रिय पुढाकार घ्यायची आवश्यकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 28, 2017 07:15 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close