सर्वपक्षीयांकडून ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा, भाजपच्या उमेदवारांनी सहभाग टाळला

सर्वपक्षीयांकडून ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा, भाजपच्या उमेदवारांनी सहभाग टाळला

  • Share this:

evm_Antyatra28 फेब्रुवारी : महापालिका निवडणुकीत भाजपने ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा आरोप करत सर्वपक्षीय पराभूत उमेदवार रस्त्यावर आले आहे. राज्यात ठिकठिकाणी ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढून पराभूत उमेदवारांनी टाहो फोडलाय. मात्र, या आंदोलनात भाजपचे उमेदवार सहभागी झाले नाही.

संजय काकडेंवर आरोप

इव्हीएममध्ये भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने हेराफेरी केल्याचा आरोप करत सर्वपक्षीय उमेदवारांनी एकत्रित येत बालगंधर्व रंगमंदिरासमोर ईव्हीएमची अंत्ययात्रा काढली. सर्वांनी निदर्शनं करत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनीच हा घोटाळा केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय.

भाजपचे उमेदवारांची पाठ

निवडणुकीनंतर राज्यात सर्वत्र ईव्हीएम मशीन विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचं लोण अकोल्यातही पोहोचलं. अकोल्यात सर्व पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीन विरोधात मोर्चा काढला. भाजप सोडून इतर सर्व पक्षांचे नेते आंदोलनात सहभागी झाले होते. ईव्हीएम मशीनविरोधात राज्यात सर्वत्र आंदोलन सुरू झालंय. अकोला महापालिकेतही भाजपनं 80 पैकी 48 जागा जिंकून विरोधकांचा सुपडासाफ केलाय. मात्र, पराभूत उमेदवारांना हा कौल मान्य नाही. अकोल्यात भाजप सोडून सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येत ईव्हीएम विरोधी कृती समितीची स्थापना केली. समितीच्या वतीनं शहरात ईव्हीएम मशीनची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 28, 2017, 6:00 PM IST

ताज्या बातम्या