Elec-widget

पुण्यात भाजपकडून EVM घोटाळा, सर्वपक्षीयांचा आरोप

  • Share this:

evmcounting

27 फेब्रुवारी :  पुणे मनपाच्या निवडणुकीत भाजपने पार धुव्वा उडवल्यानंतर पराभूत उमेदवार एकत्र आलेत आणि इव्हीएम मशीनच्या विरोधात आघाडी उघडली आहे. महापालिकेच्या निकालानंतर शहरात भाजपला बहुमत मिळालं असलं तरीही निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शकपणे झाली नसून भाजपने 'इव्हीएम'ची सेटिंग बदलल्याचा गंभीर आरोप पराभूत उमेदवारांनी केला आहे. या विरोधात सर्वपक्षीय उमेदवारांनी हायकोर्टात याचिका करणार असून फेरमतदानाची मागणी केली आहे.

भाजपने मशीन मॅनेज केल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला. कोणततंही बटण दाबलं तरी कमळाला मत जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच, मतदानाची आकडेवारी आणि जाहीर केलेली आकडेवारी जुळत नसल्याने इव्हीएम मशीन्स मध्येच घोटाळा असल्याचा आरोप सर्वांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, एका व्यक्तीने मतदान करताना प्रत्येक जागेला एक प्रमाणे चार मते नोंदवल्यावर ते मत ग्राह्य धरले जाते. चार मते देऊन झाल्यावर "बीप' असा आवाज येऊन लाईट लागतो आणि मतदाराला मतदान झाल्याचं कळतं. मात्र काही प्रभागांमध्ये चारही जागांसाठी शहरात वेगवेगळ्या संख्येने मतदान झाल्याचं मतमोजणीनंतर लक्षात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 27, 2017 04:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...