S M L

पुण्यातल्या महाराज ग्रुपचा अध्यक्ष गणेश नाणेकरवर प्राणघातक हल्ला

Samruddha Bhambure | Updated On: Feb 25, 2017 03:54 PM IST

 पुण्यातल्या महाराज ग्रुपचा अध्यक्ष गणेश नाणेकरवर प्राणघातक हल्ला

25 फेब्रुवारी :  पुणयातल्या चाकणमध्ये महाराज गृपचा अध्यक्ष गणेश नाणेकर याच्यावर अज्ञातांनी धारदार हत्याराने काल वार केले.  सध्या त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असून डॉक्टर त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करतायेत.

मारेकऱ्यांकडून गणेश नाणेकरच्या पोटात आणि पाठीत अनेक वार करण्यात आलेत. त्यामुळे त्याच्या किडनीला इजा झाली आहे. यामुळे त्याची एक किडनीही फेल होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय.

नाणेकर हा सामाजिक कामं करणाऱ्या महाराज ग्रुपचा अध्यक्ष आहे. नाणेकरची स्वतःची तालीमही आहे.

बिर्ला रुग्णालयाबाहेर सध्या ३ ते ४ हजार तरुण जमलेत. नाणेकर पुण्याच्या तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय असल्यामुळे त्याच्या प्रकृतीबाबत जाणून घ्यायला ही गर्दी जमलीय. या पार्श्वभूमिवर कोणताही नुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 25, 2017 08:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close