रवींद्र धंगेकर ठरले जायंट किलर, भाजपचे गटनेते गणेश बीडकरांना चारली धूळ

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 24, 2017 07:03 PM IST

रवींद्र धंगेकर ठरले जायंट किलर, भाजपचे गटनेते गणेश बीडकरांना चारली धूळ

ravindra_vs_beedkar24 फेब्रुवारी : पुण्यातील प्रभाग क्रमांक १६ मधून भाजपचे सगळ्यात ताकदवान उमेदवार समजले जाणारे भाजपचे गटनेते गणेश बीडकर यांना निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

मनसेतून काँग्रेसवासी झालेले रवींद्र धंगेकर यांनी बीडकरांचा पराभव केला. त्यामुळे धंगेकर पुण्यात जायंट किलर ठरलेत. धंगेकरांना भाजपमध्ये येण्याची विनंती खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. मात्र गिरीश बापट आणि गणेश बीडकर यांनी त्यांना पक्षात घ्यायला विरोध केल्याने अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

अखेरच्या क्षणी धंगेकर यांना तांत्रिक चुकीमुळे काँग्रेसचे चिन्ह मिळण्यातही अडचण निर्माण झाली होती. मात्र, तरिही आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणूक लढवून त्यांनी बीडकरांना धूळ चारली. धंगेकरांना शुभेच्छा देण्यासाठी धंगेकर यांच्या घरी सकाळपासूनच कार्यकर्त्यांची रीघ लागलीय. कार्यकर्त्यांच्या बळावर आपण निवडून आलोय असं सांगत धंगेकरांनी सगळं श्रेय कार्यकर्त्यांना दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 07:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...