प्रचारात 'गुड न्यूज' मिळालेल्या रुपाली पाटलांना निकालानंतर 'बॅड न्यूज'

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 24, 2017 12:56 PM IST

प्रचारात 'गुड न्यूज' मिळालेल्या रुपाली पाटलांना निकालानंतर 'बॅड न्यूज'

rupali_thombre

24 फेब्रुवारी : प्रचारादरम्यान ‘गुड न्यूज’ मिळालेल्या मनसे नगरसेविकेला विजयाची ‘गुड न्यूज’ मिळालेली नाही. पुण्यातील नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. भाजप उमेदवाराकडून रुपाली पाटील ठोंबरे पराभूत झाल्या.

पुण्यातील प्रभाग क्रमांक 15 मधून निवडणूक लढवत असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे गरोदर होत्या. प्रभागात अटीतटीची निवडणूक असल्यामुळे त्यांनी प्रभागात जोरदार प्रचार केला.

शुक्रवारी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी शनिवार-सदाशिवपेठेत अर्थात प्रभाग 15मध्ये पदयात्रेत असतानाच रुपाली यांना प्रसववेदना सुरू झाल्या. पदयात्रा आटपून त्या घरी आल्या. रात्री उशिरा शिवजीनगर भागातील क्लाऊड नाईन या खाजगी रुग्णालयात भर्ती झाल्या आणि शनिवारी सकाळी त्यांनी मुलाला जन्म दिला.

हे सगळं अनपेक्षित होतं कारण 5 मार्च ही प्रसूतीची तारीख त्यांना देण्यात आली होती. आणि प्रचाराच्या निमित्ताने पदयात्रेत झालेलं चालणं त्यांना फायद्याचं ठरलं असं त्यांना वाटतंय. कारण त्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली.

Loading...

अर्थात, रुपाली पाटलांना प्रतीक्षा होती विजयाच्या गुड न्यूजची. आता त्यांना फक्त मुलाच्याच जन्माचा आनंद साजरा करावा लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2017 12:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...