उपेक्षा संपली, पारधी समाजातल्या राजश्री काळे विजयी

उपेक्षा संपली, पारधी समाजातल्या राजश्री काळे विजयी

  • Share this:

rajshree 2

24 फेब्रुवारी : भाजपच्या राजश्री काळे या पारधी समाजातील पहिल्या नगरसेविका ठरल्या आहेत.मूळच्या सोलापूरच्या आणि यमगरवाडी या पारधी समाजातील मुलांसाठी सुरू केलेल्या शाळेतल्या पहिल्या विद्यार्थिनी, राजश्री ज्ञानेश्‍वर काळे या प्रभाग ७ अ मधून निवडून आल्या.

पारधी समाजाची व्यक्ती म्हटलं की गुन्हेगारीचा शिक्का आणि उच्च्भ्रू समाजाची तिरपी नजर कायमचीच. त्यामुळे सर्वसामान्य समाजापासून दूर राहणाऱ्या या समाजातली एक मुलगी पुण्यासारख्या शहरात महापालिकेच्या निवडणुकीत भाजपसारख्या पक्षाची उमेदवारी मिळवून निवडणुकीला उभी राहिली.

हा भाग भटक्या विमुक्तांसाठी आरक्षित होता. पारधी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राजश्री काळे यांना त्यांच्या आयुष्यात खूप छळ, अपमान सहन करावा लागला.वडिलांवर गुन्हेगारीचे शिक्के.यासगळ्याला तोंड देत त्यांनी गरवारे कॉलेजला शिपाई म्हणून नोकरी केली. आणि सोबतच रस्त्यांवर राहणाऱ्यांसाठी रेशनकार्ड, जातीचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी राजश्रीताईंनी गिरीश बापटांच्या घरावर मोर्चाही काढला होता. त्यामुळेच बापट यांना त्यांचा संघर्ष माहिती होता.

आर्थिक कुवत नसतानाही राजश्रीताई स्वतःच्या समाजासाठी, समाजातल्या उपेक्षीत घटकासाठी उभ्या राहिल्या. आणि भाजपने अशा अव्हेरलेल्या समाजातल्या महिलेला उमेदवारी देऊन कौतुकास्पद काम केलं. आणि पुण्याच्या नागरिकांनीही राजश्री काळेंना निवडून देऊन, त्यांच्या कष्टाचं चीज केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First published: February 24, 2017, 9:10 AM IST

ताज्या बातम्या