Elec-widget

..तर राजकारणातून निवृत्ती, संजय काकडेंची वाडेश्वर कट्ट्यावर घोषणा

..तर राजकारणातून निवृत्ती, संजय काकडेंची वाडेश्वर कट्ट्यावर घोषणा

  • Share this:

pune katta 2

अद्वैत मेहता, 22 फेब्रुवारी : पुण्यात 55.50मतदान झाल्यानंतर आता कट्ट्याकट्ट्यावर चर्चा रंगू लागल्या आहेत त्या म्हणजे कोण होणार पुण्याचा कारभारी ? राष्ट्रवादी पुन्हा मारणार बाजी का भाजप गड काबीज करणार?

यंदाची पुणे महापालिका निवडणूक ही मुख्यतः राष्ट्रवादी आणि भाजपमधली घमासान लढाई ठरेल,याची चुणूक प्रचारादरम्यान आलीच होती आणि आता मतदानानंतर ही उत्कंठा शिगेला पोचली आहे.पुण्यात दर बुधवारी वाडेश्वरकट्टा रंगतो जिथे राजकीय, सामाजिक,सांस्कृतिक, नाट्य,सिनेमा,खेळ अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले नामवंत लोक गप्पांचा फड रंगवतात.आजच्या बुधवारी पालिका निवडणूकम प्रचारातला शीण घालवून श्रमपरिहार आणि गप्पा मारण्याकरता कट्ट्याचे चालक सतीश देसाई, अंकुश काकडे, गोपाळ चिंतल आणि श्रीकांत शिरोळे या प्रसिद्ध चौकडीने भाजपचे संजय काकडे ,काँग्रेसचे विश्वजित कदम, सेनेचे विनायक निम्हण ,मनसेचे हेमंत संभूस यांना निमंत्रित केलं होतं.

pune katta 3संजय काकडे उर्फ नाना यांनी भाजपला तब्बल 91 जागा मिळतील असा दावा करताना भाजपची एकहाती सत्ता आली नाही तर राजकीय जीवनातून निवृत्त होऊ अशी घोषणा केली. राष्ट्रवादीच्या अंकुश काकडे यांनी पुणे महापालिकेचा गड पुन्हा राष्ट्रवादीच राखणार असल्याने संजय काकडे यांना निवृत्ती घ्यावी लागेल आणि पुणेकर एका चांगल्या नेत्याला मुकतील असा टोमणा मारला.शिवसेनाच पुण्याचा महापौर ठरवेल अशी आरोळी ठोकत विनायक निम्हण यांनी दोन काकडेंच्या रंगलेल्या कलगीतुऱ्यात उडी घेतली.

विश्वजित कदम आणि अभय छाजेड यांनी पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे तेव्हा आमची ताकद कमी लेखू नका असं सांगत हम भी है मैदान मे असं सांगितलं तर राज ठाकरे यांच्या पॉवर पॅक सभेमुळे आणि जबरदस्त सादरीकरणामुळे मनसेचं घसरलेलं इंजिन रुळावर आल्याची चर्चा सुरू झाल्याने मनसेच्या हेमंत संभूस यांनी गेल्या वेळेप्रमाणे मनसे सुसाट धावेल असं आवेशात सांगितलं.

Loading...

कट्ट्याचे आयोजक सतीश देसाई,गोपाळ चिंतल आणि श्रीकांत शिरोळे यांनीही त्यांचे आडाखे,अंदाज व्यक्त केले.गरमागरम इडली सांबार आणि वाफाळता चहा घेत कट्ट्ट्यावरची जुगलबंदी, मैफल संपली पण ज्याच्या त्याच्या मनात उद्या 23 फेब्रुवारीला 162 जागांकरता होणाऱ्या निवडणुकीत 81 हा जादुई आकडा कोण गाठेल याचे तर्कवितर्क सुरू होते.

गेल्या वेळेपेक्षा वाढलेलं 5 टक्के मतदान ,नवमतदार अर्थात फर्स्ट time वोटर्सची मतं कुणाला जाणार, जाणवणारा नरेंद्र मोदी फॅक्टर ,मनसेचा मतदार यावेळी काय करणार याची उत्सुकता ,अजित पवार यांची नियोजनबद्ध प्रचार मोहीम, गिरीश बापट संजय काकडे आणि स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांभाळलेली भाजपची प्रचाराची धुरा, मुख्यमंत्र्यांची भर दुपारची रद्द झालेली सभा,गुंडांचा प्रवेश अशा गलबल्यात सत्तेचा लंबक राष्ट्रवादीकडे झुकणार का भाजपकडे ,कांटे की टक्कर अर्थात घमासान लढाईमध्ये कोण होणार महापौर याचं उत्तर गुरुवार 23 फेब्रुवारीला मिळणार आहे आणि जागरूक, चोखंदळ, सूज्ञ पुणेकरांचा कौलही स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2017 02:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...