S M L

पुण्याचा कारभारी कोण ? दादा का भाऊ ?

Samruddha Bhambure | Updated On: Feb 19, 2017 09:01 PM IST

पुण्याचा कारभारी कोण ? दादा का भाऊ ?

अद्वैत मेहता, पुणे

19 फेब्रुवारी : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं पुणे राष्ट्रवादी काँग्रेसनं पाहता पाहता काबीज केलं आणि गेली 10 वर्ष।पुणे महपालिकेवर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. अर्थात ही सत्ता एकहाती नाही आणि म्हणून पिंपरी चिंचवड सारखा विकास पुण्याचा करतायेत नाही अशी अजित पवार यांची खंत आहे. सुरेशभाई कलमाडी यांच्याकडून अजितदादांनी सत्ता काबीज।केली पण सुरुवातीला भाजप सेनेच्या सोबत पुणे पॅटर्न आणि नंतर पुन्हा काँग्रेस असाच संसार करावा लागला. आता केंद्रात, राज्यात सत्ता नाही, नगरपालिकेतही  फटका बसला आणि पालिकेचा गडही जातो की काय असा सवाल उभा ठाकलाय कारण भाजप नं उभं केलेलं आव्हान.

2014 च्या मोदी लाटेत 2 खासदार 81 आमदार निवडून आले आणि नव्या विमानतळाची घोषणा, मेट्रोचं भूमिपूजन,10 वर्ष लटकलेल्या प्रलंबित विकास आराखद्याला मान्यता,स्मार्ट सिटीचं बिगुल पुण्यात वाजवत भाजपनं धडाका लावला आणि दादा विरुद्ध भाई ऐवजी दादा विरुद्ध भाऊ अर्थात अजित पवार विरुद्ध सुरेश कलमाडी यांच्या ऐवजी अजित पवार विरुद्ध गिरीश बापट असा आजी माजी पालकमंत्री यांच्यात यंदा घमासान लढाई रंगलीय. सहयोगी खासदार संजय काकडे उर्फ नाना यांनी साम दाम दंड भेद असे सगळे पर्याय वापरत प्रतिपक्षातील दिग्गज नगरसेवक, गुंड पुंड अशांना पक्षात घ्यायला सुरुवात केली. अर्थात याचा फटका निष्ठावंत कार्यकर्त्याना बसला, राष्ट्रीय स्वयंसेवकाची नाराजीही ओढवून घ्यावी लागली पण वारू चौखुर उधळलेला असल्यानं भान सुटलं. त्यात शिवसेनेनं संपूर्ण राज्यात युती तुटली आणि काँग्रेसमधून सेनेत घरवापसी झालेले विनायक निम्हण यांनी भाजप वरच निशाणा साधला. युती तुटली मात्र आघाडी झाली. अजित पवार यांनी कलमाडी यांच्या गैर हजेरीचा फायदा उठवत हर्षवर्धन आणि पृथ्वीराज यांना डावलत अशोक चव्हाण आणि विश्वजित कदम यांच्याशी संधान साधलं. गेल्यावेळी राज लाटेत तब्बल 29 नगरसेवक निवडून येऊन पालिकेत विरोधी पक्ष ठरलेल्या मनसे मधून काही नगरसेवक दुसऱ्या पक्षात गेले।पण राज यांच्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सभेमुळं पक्षात जान आली य. उद्धव ठाकरे, शरद पवार, अजीत पवार, पृथ्वीराज, धनंजय मुंडे, प्रकाश जावडेकर, मनोहर पर्रीकर या सर्वांनी फड गाजवले पण चर्चा झाली न झालेल्या सभेची भाजपचे स्टार कॅम्पेनर मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्य्यात झंजावती 4 सभा घेतल्या पण सदाशिव पेठेत भर दुपारी 2 वाजता सभा घ्यायचा उपक्रम अंगलट आला. 1 ते 4 बंद म्हणजे बंद अशी ख्याती असलेल्या भागात रिकाम्या खुर्च्या, नागरिकांनी फिरवलेली पाठ यामुळे सभा रद्द करत काढता पाय घ्यायची नामुष्की फडणवीसांवर आली.

नोटबंदी, अच्छे दिन, मेट्रो, कचरा ,स्मार्ट सिटी,स्टार्ट अप कॅपिटल अशा चमकदार शब्दां भोवती प्रचार रंगला. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत आणि चोखंदळ, जागरुक,सजग पुणेकर आपल्यालाच कौल देतील असं प्रत्येक पक्षाला वाटतंय. गेल्या 15 दिवसात गटार गंगा झालेल्या मुळा मुठा नदीच्या पात्रात अनेक पात्र आली आणि फड रंगवूनन गेली.आता 4 वॉर्डांचा 1 प्रभाग अशा 41 प्रभागातील 162 जागांसाठी 1000 च्या वर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. वाहतूक कोंडी आणि कचरा कोंडी या दोन कोंडीत जीव गुदमरलेला पुणेकर मेट्रो तून प्रवासाचं, 24 तास पाणी मिळण्याचं, निसर्गसमृद्ध टेकडयांवर फिरायला जाण्याचं स्वप्न पाहतोय पण चांगली हवा ,सुरक्षित पेन्शनंरांचं पुणे ते i.t ची राजधानी, ऑटो हब, शिक्षण ,संस्कृतीचं माहेरघर ते आता स्मार्ट सिटी अशी बिरूदं मिरवत असलेलं पुणे बकाल होतंय. पुण्याची मुंबई होतेय आणि हे चित्र कोण बदलेल याचा फैसला 23 फेब्रुवारीला होणार आहे आणि त्या करता 21 फेब्रुवारीला कौल द्यायला पुणेकर।किती उत्सुक आहेत , उत्साहाने चुरशीने मतदानाला बाहेर पडणार का पेशवाई झोपेने खुद्द मुख्य मंत्र्यांना गारद केलं तसं झोपी जाणार या कळीच्या प्रश्नांमुळे सगळ्या उमेदवारांची झोप मात्र उडाली आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 19, 2017 09:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close