राज्यात दुसरा सर्जिकल स्ट्राईक करणार -पर्रिकर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2017 07:54 PM IST

parikar_on_retird18 फेब्रुवारी : भाजप आणि सेनामध्ये वादावादी सुरुच आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनीही आता महापालिका निवडणुकांमध्ये उडी घेतली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या धर्तीवर राज्यात दुसरा सर्जिकल स्ट्राईक करणार असल्याचं सांगितलंय.

पर्रिकर यांनी थेट सेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर तोफ डागलीये. मात्र पर्रिकर यांनी असं वक्तव्य करत देशाच्या शत्रुंची तुलना त्यांनी थेट राजकीय विरोधकांशी केलीये. त्यामुळे पुढच्या काही काळात सेना आणि भाजपमधील युद्ध जास्तच भडकण्याची शक्यता निर्माण झालीये.

भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत पर्रिकर यांनी  उद्धव ठाकरे यांना मुंबईतील तर अजित पवारांना पिंपरी चिंचवडमधील सत्ता जाण्याची भीती वाटत असल्यानं ते भाजपवर टीका करत असल्याचा पलटवार पर्रिकर यांनी केला. दोन्ही महापालिका श्रीमंत आहेत आणि त्या आता हातातून जातील त्यामुळे भाजप विरुद्ध सेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून गरळ ओकली जात असल्याचंही पर्रिकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2017 07:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...