गोविंद वाकडे,पिंपरी-चिंचवड18 फेब्रुवारी : पिंपरी चिंचवड मधील महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून केला जाणारा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. पण या प्रचाराबरोबरच महापौरपदाचे दावेदार ठरू शकणाऱ्या उमेदवारांनी आत्तापासूनच छुपा प्रचार सुरू केला आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता मिळवण्यासाठी आतुर झालेल्या राष्ट्रवादी आणि भाजप च्या उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिलाय. त्यातही प्रभाग क्रमांक 28 मधील भाजपचे उमेदवार, शत्रुघ्ण काटे हे आघाडीवर आहेत. प्रचाराचा हा जोर वाढविन्या मागच कारणही तसच आहे. पिंपरी महापालिकेतील महापौरपद हे OBC म्हणजेच इतर मागास वर्गीयांसाठी आरक्षित करण्यात आल्याने , त्या गटात मोडणारे काटेनी स्वतःला तयार केलं आहे.तर इकडे एन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर, नेत्यांनी सोडचिट्टि दिल्यामुळे एकाकी पडलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये ,आपल्या8 समर्थक नगरसेवकासह प्रवेश करून राष्ट्रवादिला संजवनि देणारे, प्रभाग क्रमांक 17 मधील उमेदवार काँग्रेसचे माजी जेष्ठ नेते, भाऊसाहेब भोईर यांनाही उद्याच्या महापौर पदाचे वेध लागलेयत .खरतर,सत्ता स्थापन करून महापौरपदी आपले उमेदवार वीराजमान करण्याचं स्वप्न शिवसेना आणि काँग्रेससह इतरही पक्ष बघतायत, स्वप्न बघण्याला काही हरकतही नाही, अर्थात या हे सर्वजन बघत असणारे स्वप्न सत्यात उतरविन्यासाठी नागरिक त्यांना संधी देणार की त्याचं स्वप्न दिवास्वप्न ठरणार हे 23 तारखेला कळेलच.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv