मुख्यमंत्र्यांची पुण्यातील सभा गर्दीअभावी रद्द

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 18, 2017 08:19 PM IST

मुख्यमंत्र्यांची पुण्यातील सभा गर्दीअभावी रद्द

cm_sabha_pune18 फेब्रुवारी : 'पुणे तिथे काय उणे' असं उगाच म्हटलं जात नाही. आणि चोखंदळ पुणेकर काय असता याचा फटकाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बसला. भर दुपारी गर्दी अभावी मुख्यमंत्र्यांची सभा रद्द करावी लागली.

आज पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची सभा आयोजित करण्यात आली होती. दुपारी 2 वाजता न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड इथं ही सभा होणार होती.  मात्र भर दुपारच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवली.सभेतल्या सर्व खुर्च्या रिकाम्याच होत्या. त्यामुळे सभेला कुणीच नसल्यामुळे मुख्यमंत्री आल्या पावली परतावं लागलं.

मुख्यमंत्र्यांनी सभा रद्द झाल्याचं ट्विट केल्यानंतर, सोशल साईट्सवर विनोदांचा पाऊस सुरू झाला. विशेष म्हणजे पुणेकर दुपारच्या वेळी कुणालाही भेट देत नसता हेच आज अधोरेखित झालं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2017 05:17 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...