S M L

पिंपरीत भाजपमध्ये चढाअोढ, प्रकाशनाआधीच जाहीरनामा फेसबुकवर

Sachin Salve | Updated On: Feb 17, 2017 03:04 PM IST

पिंपरीत भाजपमध्ये चढाअोढ, प्रकाशनाआधीच जाहीरनामा फेसबुकवर

17 फेब्रुवारी :  पिंपरी चिंचवड भाजपमध्ये जाहीरनाम्यावरून श्रेयवाद रंगलाय. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आज जाहीरनामा प्रसिद्ध करणार होते. पण महेश लांडगे यांच्या गटानं सकाळीच फेसबुकवर जाहीरनामा पोस्ट केला. आता बापट जो जाहीरनामा प्रसिद्ध करतील, आणि पुणे शहरासाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला, तो या फेसबुकवरच्या जाहीरनाम्यापेक्षा वेगळा आहे का, हेच नागरिकांना कळत नाहीय.

भाजपच्या या जाहीरनाम्याला जाहीर नसून हा निर्धारनामा असल्याचा दावा केलाय. अनेक नव्या प्रकल्पांची घोषणा यात करण्यात आलीये. 24 तास पाणीपुरवठा, कचऱ्याचं वर्गीकरण करणाऱ्या सोसायट्याना करात सवलत देण्यात येईल, महापालिकेच्या सर्व रुग्णालयात ट्रामा सेंटर, डायलिसिस सेंटरची सामाजिक मदतीतून उभारणी, आरक्षित भूखंडाचा विकास अश्या मुलभूत सुविधांवर भर देण्यात आलाय.मात्र,  अनधिकृत बांधकामे  आणि रेडझोंन च्या प्रश्नावर ठोस आश्वासन नाहीच देण्यात आलं नाही. आधीच गुंडांना प्रवेश देण्यावरून पुणे भाजपवर टीका होतेय. त्यात आता अंतर्गत वादाची चर्चाही पुण्यनगरीत चांगलीच रंगलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो कराबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 17, 2017 03:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close