'मतदान करा, चित्रपटाच्या तिकिटात 15 टक्के सूट मिळवा'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 16, 2017 10:13 PM IST

'मतदान करा, चित्रपटाच्या तिकिटात 15 टक्के सूट मिळवा'

pune_voting16 फेब्रुवारी : पुणे तिथे काय उणे असं उगाच म्हटलं जात नाही. मतदानाचा उत्सव साजरा करण्यासाठी पुणे मल्टिप्लेक्स असोसिएशनने पुढाकार घेतलाय. मतदान करणाऱ्यांना तिकिटामध्ये 15 टक्के सूट देण्याची घोषणा केलीये.

विक्षिप्त आणि चोखंदळ म्हटलं की डोळ्यासमोर येतं पुणे...अनेक अनोख्या, नाविन्यपूर्ण कल्पना पुण्यात जन्म घेतात आणि त्यांचं अनुकरण ही होतं. आता दिवस पालिका निवडणुकांचे आहेत आणि प्रचार रंगात आलाय. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध फंडे वापरत आहेत. पुणेकर हे जागरूक असले तरी मतदानाच्या टक्केवारीत ही गोष्ट बऱ्याच वेळा प्रतिबिंबित होत नाही आणि म्हणूनच आता पुणेकरांनी मतदान करावं अर्थात ते कुणालाही करावं. विशिष्ट पक्ष किंवा उमेदवाराला नाही तर फक्त कर्तव्य बजावा याकरता मल्टिप्लेक्स चालक आणि हॉटेलमालक एकत्र आले आहेत.

मतदान करा आणि 21 फेब्रुवारीला मल्टिप्लेक्समध्ये जावून सिनेमा पहा आणि तिकिटात घसघशीत 15 टक्के सूट मिळवा अशी अभिनव योजना थिएटरमालक संघटनेनं मांडली आहे तर पाठोपाठ रेस्टॉरंट आणि हॉटेल संघटनेनं तर एक पाऊल पुढे जात मतदान करा आणि मिष्टान्न खा म्हणजे डेझर्ट आणि फुकटात अशी ऑफर दिलीय. म्हणजे एक से भले दो किंवा आंधळा मागतो एक डोळा..

अर्थात ही संधी मतदान केलं असेल तुमच्या बोटावर शाई असेल तर आणि फक्त मंगळवार 21 फेब्रुवारी याच दिवशी मिळणार आहे.

पुण्याचे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या आवाहनाला दिलेला हा प्रतिसाद आहे. अर्थात आता वेळ आहे पुणेकरांची. आळस झटकून मतदान करण्याची कारण 5 वर्षातून एकदा ही संधी मिळते. खरं तर स्मार्ट आणि चोखंदळ पुणेकरांना असं आमिष दाखवून घराबाहेर काढणं भूषणावह नाही पण निदान या फंडयांमुळे तरी मतदानाचा टक्का वाढेल अशी अपेक्षा करूया.

Loading...

सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमावेळी किंवा भारतानं वर्ल्ड कप पटकावला तेव्हा एकावर एक मिसळ फ्री ही आयडिया हिट झाली होती. आता बघूया मतदान करा आणि स्वीटडिश खा आणि सिनेमा तिकिटात सूट मिळवा ही आयडिया किती हिट ठरते ते!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 16, 2017 08:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...