15 फेब्रुवारी : इस्लाममध्ये व्याज घेणं पाप समजलं जातं त्यामुळे अनेक मुस्लिम बँकेत खाती खोलत नाहीत असा दाखला देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नोटबंदी निर्णय हा मुस्लिम विरोधी आहे अशी टीका केलीये.
पुण्यात राष्ट्रवादीचा बहुभाषिक मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी सध्याचे राज्यकर्ते,सरकार हे अल्पसंख्यांक विरोधी निर्णय घेत असल्याची तोफ डागली.
शरद पवार यांनी सामाजिक ऐक्य या शब्दाऐवजी सामाजिक समरसता हा संघ प्रणित शब्द आणून विपरीत निर्णय घेत असल्याचं म्हटलंय. निर्णय घ्यावे लागतात पण त्यांचा सामाजिक परिणाम काय होईल याचा विचार करावा लागतो. पण सध्याचं सरकार असा विचार करत नाही अशी टीकाही पवारांनी केली.
नोटबंदी निर्णय हा मुस्लिम विरोधी असल्याचं सांगत पवार यांनी इस्लाम चा दाखला दिला. इस्लामची मार्गदर्शक तत्वे आहेत. त्यानुसार व्याज घेणं पाप समजलं जातं असं सांगत अनेक मुस्लिम बँकेत खाती खोलत नाहीत. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील वस्त्रोद्योग नोटबंदीमुळे बुडाला, 40 ते 50 टक्के विणकर कामगार मालेगाव सोडून बिहारला स्थलांतरित झाले असा दावा पवार यांनी केला.
सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील एक महिला मंत्री या हिंदूंची लोकसंख्या वाढावी. या करता हिंदूंनी 8 ते 10 मुलांना जन्म द्यावा याकरता आग्रही आहेत ही गोष्ट चमत्कारिक आहे याकडे पवारांनी लक्ष वेधले.
विशेष म्हणजे पवार यांनी हा मेळावा आपण निवडणूक आहे म्हणून घेत नाही तर सर्व समाजात सौहार्द राहावं म्हणून घेत असल्याचं स्पष्ट केलं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv