S M L

एनसीपी म्हणजे 'नॅशनलिस्ट कनफ्युज पार्टी' - मुख्यमंत्री

Samruddha Bhambure | Updated On: Feb 13, 2017 10:43 PM IST

एनसीपी म्हणजे 'नॅशनलिस्ट कनफ्युज पार्टी' - मुख्यमंत्री

13 फेब्रुवारी :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीवर हल्लाबोल केलाय. एनसीपी म्हणजे 'नॅशनलिस्ट कनफ्युज पार्टी' अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे इथल्या जाहीर सभेत केली आहे. निवडणुकीच्या काळात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप प्रचंड प्रमाणात होत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक गुंडांना भाजपने प्रवेश देऊन पवित्र करुन घेतलेत, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की राष्ट्रवादी हा संभ्रमात असलेला पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचं नाव 'राष्ट्रवादी कनफ्युज पार्टी' असं ठेवायला हवं.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणामध्ये शहरीकरणाच्या एकंदर आव्हानासहित वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, झोपडपट्टी अशा विविध प्रश्‍नांचा वेध घेत मतदारांपुढे विविध योजना मांडल्या. भाषणाच्या अखेरच्या टप्प्यांत फडणवीस यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांना लक्ष्य केले. याचबरोबर, त्यांनी शिवसेनेचा थेट नामोल्लेख न करता टीका केली.

गेल्या काही दशकांत देशात वेगाने शहरीकरण झाले आहे. अन्न वस्त्र निवाऱ्यासहित इतर संधी शोधत लोक वेगाने शहरांकडे आले. 2011 च्या जनगणेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या सुमारे निम्मी लोकसंख्या म्हणजे साडेपाच कोटी शहरांत राहतात. पण आज पुण्याची अवस्था काय आहे? शहरात पाण्याचा प्रश्‍न, प्रदुषण, वाहतूक असे प्रश्‍न आहेत. मात्र महानगरपालिका ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्याची धारणा असल्यास पुण्यासारखी बकाल शहरे तयार होतात. पुणे हे महाराष्ट्राचे 'पाॅवर हाऊस' आहे. जगभरातले उद्योजक गुंतवणुकीसाठी पुण्याचाच विचार करतात. मात्र जागतिक व्यवसायाचे केंद्र म्हणून पुण्याचा विचार असा कधी झालेलाच नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राजधानी बनण्याची क्षमता पुण्यामध्ये आहे.याचबरोबर, येत्या तीन वर्षांत पुण्यास देशाचे 'स्टार्ट अप कॅपिटल' बनवू, असं अश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

पुण्यासारख्या शहरामध्ये सांदपाणी व्यवस्थापनाचा प्रश्‍न अत्यंत गंभीर आहे. शहरात मैला हा नदीत सोडला जातो. नद्यांमध्ये सोडलेल्या सांडपाणी हे शहरामधल्या रोगराईचं मुख्य कारण आहे. म्हणूनच या नद्यांच्या शुद्धीकरणासाठी 1 हजार कोटी रुपयांचा आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असंही ते म्हणाले.

Loading...

पिंपरी-चिंचवडही राष्ट्रवादीकडे राहणार नाही. आपण सगळ्यांनी राष्ट्रवादीचा भ्रष्टाचार पाहिला आहे. काँग्रेसचे तर अस्तित्वच दिसत नाही असे ते म्हणाले. शिवसेनेचे नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. कुठे कुणासोबत युती करायला मिळते का असा विचार आमचा ‘मित्रपक्ष’ करत आहे, असं ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यावर प्रेम आहे. पुणे त्यांच्या आणि मुख्यमंत्री म्हणून माझ्याही अजेंड्यावर आहे. मात्र याचा पुरेसा फायदा नाही. जोपर्यंत महानगरपालिकेत भाजपची सत्ता येत नाही; तोपर्यंत विकसित पुणे हे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. तुम्ही मला भाजपचा महापौर द्या; मी तुम्हाला विकास देतो. तुम्ही मला बहुमत द्या; मी तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं पुणे देतो, असं आश्वासनही  मुख्यमंत्र्यांनी पुणेकरांना दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 09:09 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close