S M L

अखेर ओवेसींच्या सभेला पुणे पोलिसांची परवानगी

Samruddha Bhambure | Updated On: Feb 13, 2017 05:42 PM IST

owasisi

13 फेब्रुवारी : पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्या होणाऱ्या असदुद्दीन ओवेसी यांच्या प्रचार सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली आहे.

कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव पोलिसांनी आधी या जाहीर सभेसाठीची परवानगी नाकारली होती. मात्र एमआयएम असदुद्दीन ओवेसांची सभा घेणार या भूमिकेवर ठाम होते. अखेर पोलिसांनीही त्यांना उद्या 14 फेब्रुवारीला पुण्यातील भवानी पेठेत टिंबर मार्केट इथल्या सावित्रीबाई फुले स्मारकाजवळ ही परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यात दुसऱ्यांदा असदुद्दी ओवेसींच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती.

दरम्यान, आपल्या प्रचारसभेला परवानगी नाकारण्यात आल्याने ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. टि्विटद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना ओवेसी म्हणाले की, गेल्याच वर्षी पुण्यात आपली सभा झाली. ती शांततेत पार पडली. मुंबईत झालेल्या दोन सभाही शांततेतच पार पडल्या. मी कोणत्या नियमांचे उल्लंघन केल्यास माझ्यावर कारवाई करण्यात यावी, असं म्हटलं होतं.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 04:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close