S M L

गदादे पाटलांना तोडच नाय..,राष्ट्रवादीच्या उमेदवाराने धरला 'शांताबाई'वर ठेका

Samruddha Bhambure | Updated On: Feb 13, 2017 03:46 PM IST

गदादे पाटलांना तोडच नाय..,राष्ट्रवादीच्या उमेदवाराने धरला 'शांताबाई'वर ठेका

13 फेब्रुवारी :  निवडणुका म्हटलं तर प्रचार आलाच...आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष नवनव्या शकला लढवत असतात. अशीच एक अनोखी शक्कल लढवली आहे ती पुण्याल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी. काही महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवणाऱ्या संजय लोंढे यांनी उमेदवारांच्या प्रचारासाठी शांताबाई... या गाण्याचा रिमेक केला आहे.

'शांताबाई..अगं शांताबाई..गदादे पाटलांना तोडच नाही..शांताबाई' असे या प्रचाराच्या गाण्याचे बोल आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रभागातील कामांचा लेखाजोखाच मांडण्यात आला आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या प्रचाराचा व्हिडिओ शेअर होत आहे.

पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार प्रिया गदादे-पाटील, प्रेमराज गदादे आणि अर्चना हनमघर हे प्रभाग क्रमांक 30 जनता वसाहत-दत्तवाडी या प्रभागातून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. मात्र या उमेदवारांनी थेट शांताबाईलाच प्रचारासाठी उतरवल्याने पुण्यात सध्या त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2017 03:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close