कमळ चिन्हावर लढणाऱ्या आरपीआयच्या उमेदवारांची हकालपट्टी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 8, 2017 10:18 PM IST

athavale4408 फेब्रुवारी : पुणे-पिंपरी चिंचवड आणि सोलापूर महापालिका निवडणूक कमळ चिन्हावर लढणाऱ्या आरपीआयच्य़ा उमेदवारांची हकालपट्टी करण्यात आलीये. पक्षाध्यक्ष रामदास आठवलेंच्या आदेशानं ही कारवाई करण्यात आलीय.

जागा वाटपामध्ये सहभाग घेऊन भाजपचे ए.बी. फॉर्म पक्षाच्या इच्छुकांना देणारे पुणे शहर पदाधिकारी यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे रिपाइंची शहर कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. लवकरच नवी कार्यकारिणी घोषित केली जाणार आहे.

आमच्या पक्षात ढवळाढवळ करण्याचा अधिकार मुख्यमंत्री किंवा कोणत्याही भाजप नेत्यास नाही. आमचे पदाधिकारी फोडून त्यांना पक्षाची उमेदवारी देणे, हा राजकीय स्वार्थ आहे. आमच्या पक्षातील निर्णय आम्ही घेतोय असं रिपाइं राज्य सरचिटणीस राजा सरवदे यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 10:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...