S M L

कोर्टाचा भाजपला दणका, रेश्मा भोसलेंना 'कमळ' देण्यास नकार

Sachin Salve | Updated On: Feb 8, 2017 05:57 PM IST

कोर्टाचा भाजपला दणका, रेश्मा भोसलेंना 'कमळ' देण्यास नकार

08 फेब्रुवारी : पुण्यातील भाजपकडून लढणाऱ्या उमेदवार रेश्मा भोसलेंना उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिलाय.भोसलेंना 'कमळ' देण्यास कोर्टाने नकार दिलाय. त्यामुळे त्यांना आता अपक्ष म्हणूनच निवडणूक रिंगणात उतरावं लागणार आहे.

रेश्मा भोसले यांच्या भाजपमधून उमेदवारी अर्जाची प्रक्रिया योग्य नसल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. राष्ट्रवादीने तिकीट न दिल्याने शेवटच्या मिनिटाला रेश्मा भोसले यांनी भाजपच्या तिकीटावर फॉर्म भरला आधी याच जागेसाठी भाजपने सतीश बहिरट यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र, ऐनवेळी रेश्मा भोसले यांना ही फॉर्म दिल्याने वाद वाढला होता. निवडणूक अधिकार्यांनी हा निर्णय दोन्ही उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवावी असा निकाल दिलेला असताना अचानक रेश्मा भोसले यांचं नाव भाजपचा उमेदवार म्हणून नोंदवण्यात आलं होतं. त्याला काँग्रेसने जोरदार आक्षेप घेतला.

तर दुसरीकडे डावलण्यात आलेले उमेदवार सतीश बहिरट यांचे काका दत्ता बहिरट यांनी अधिकृत उमेदवारीसाठी कोर्टात धाव घेतली. कोर्टाने रेश्मा भोसलेंना अपक्ष ठरवत कमळ चिन्ह देण्यास नकार दिला. आता भोसलेंना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. तर बहिरट यांना कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2017 05:57 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close