येरवडा हॉस्पिटलमध्ये मतीमंद तरुणीवर बलात्काराची तक्रार

येरवडा हॉस्पिटलमध्ये मतीमंद तरुणीवर बलात्काराची तक्रार

  • Share this:

pune girl07 ऑक्टोबर : पुण्यात येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये एका मतीमंद तरुणीवर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. उस्मानाबाद येथील रहिवासी 22 वर्षांची मतिमंद तरुणी गेले वर्षभर येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये उचाराकरता भर्ती होती.

उपचारानंतर उस्मानाबादला परत गेल्यावर तिनं बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली. पण येरवडा मनोरूग्णालयात अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्था असल्यानं तसंच महिलांच्या विभागात शक्यतोवर महिला डॉक्टर आणि नर्सेस हेच जात असल्यानं बलात्कारासारखी घटना घडणं केवळ अशक्य आहे असा दावा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विलास भैलुमे यांनी केलाय.

दरम्यान, शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात मतिमंद मुलगी तसंच पोलीस अधिकार्‍यांसी चर्चा केली. गोर्‍हे यांनी नंतर येरवडा मनोरुग्णालयालाही भेट दिली. गोर्‍हे यांनी या गंभीर घटनेबद्दल चिंता व्यक्त करताना मनोरूग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेतला.

First published: October 7, 2013, 7:52 PM IST

ताज्या बातम्या