S M L
Football World Cup 2018

पत्नी आणि 2 मुलींची हत्या करून आत्महत्या

Sonali Deshpande | Updated On: Feb 5, 2017 02:46 PM IST

पत्नी आणि 2 मुलींची हत्या करून आत्महत्या

05 फेब्रुवारी : पुण्याच्या दत्तनगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडलीय.दीपक हांडे या नागरिकानं आपली पत्नी आणि २ मुलींची हत्या करून स्वतः आत्महत्या केलीय.

कर्जबाजारी झाल्यानं हांडेंनी हे कृत्य केल्याचं कळतंय.दीपक हांडेनं पत्नी आणि मुलीचा गळा आवळला आणि स्वतः गळफास लावून आत्महत्या केली.

35 वर्षीय पत्नी स्वाती, 16 वर्षीय मुलगी तेजस आणि 12 वर्षीय मुलगी वैष्णवी यांचा मृत्यू झाला आहे. दीपक यांच्याकडे सुसाइड नोट मिळाली असून त्यामध्ये आम्ही चौघे आयुष्य संपवत आहोत, कोणाविरुद्ध काहीही तक्रार नाही, असं त्यात लिहिलं आहे.

दीपक हांडे यांना तीन मुली होत्या. एक मुलगी नातेवाईकांच्या घरी होती. त्यामुळे ती वाचलीय.भारती पोलीस विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडलाय. पोलीस तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2017 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close