S M L

शिवसेना हा मित्रच, गरज पडल्यास सोबत घेणार -गिरीश बापट

Sachin Salve | Updated On: Feb 4, 2017 09:38 PM IST

girish bapat304 फेब्रुवारी : शिवसेना हा मित्रच आहे त्यांच्यावर प्रचारात टीका करणार नाही आणि गरज पडली नाही तरी त्यांनासोबत घेऊच असं ठाम प्रतिपादन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलीय.

आयबीएन लोकमतशी बोलताना बापट म्हणाले की, आयराम, किंवा नातेवाईक यांना तिकिटं दिली असली तरी हे प्रमाण खूप कमी आहे असा दावा बापट यांनी केला. पण निष्ठावंतावर अन्याय होऊ देणार नाही आणि मी माझ्या मुलाला तिकीट दिलं नाही असं स्पष्ट करत मुलाला तिकीट दिलेल्या खासदार अनिल शिरोळे यांना टोला लगावला.

राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांची पत्नी रेश्मा यांच्या भाजप मधून उमेदवारीचं समर्थन करताना बापट यांनी निवडणूक म्हणजे राजकीय आखाडा आहे, भाजप हा समुद्रासारखा आहे जिंकण्यासाठी असे डावपेच खेळावे लागतात असं सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2017 09:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close