S M L

...म्हणून निवडणुकीवर 'या' पुणेकरांचा बहिष्कार

Sachin Salve | Updated On: Feb 4, 2017 08:57 PM IST

...म्हणून निवडणुकीवर 'या' पुणेकरांचा बहिष्कार

वैभव सोनवणे, पुणे

04 फेब्रुवारी : निवडणूक या लोकशाहीचा उत्सव समजल्या जातात तर मतदार हा या उत्सवाचा राजा असतो मात्र जर या मतदारांनीच कुठल्याही कारणास्तव निवडणुकीवर ,मतदानावर बहिष्कार घालायला सुरुवात केली तर हा उत्सव मोडीत निघणार नाही का ? नेते सरकार प्रशासन हे कुणीच आपल्या समस्येला दाद देत नाहीत म्हणून या व्यवस्थेत सहभागीच व्हायचं नाही असा निर्णय पुण्यातल्या वानवडी भागातल्या नेताजीनगर सोसायटीमध्ये राहणाऱ्या मतदारांनी घेतलाय. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत हे नागरिक मतदान करणार नाहीत त्यांनी मतदानावरच बहिष्कार घातलाय.

महाराष्ट्र हौसिंग बोर्डाने बांधलेली पुण्यातली वानवडी परिसरातील सगळ्यात जुनी नेताजी सोसायटी... या सोसायटीच्या घराचं बांधकाम हे १९७६ मध्ये पूर्ण करण्यात आलं आणि सोसायटी ही रजिस्टर करण्यात आली मात्र अचानक या सोसायटीची सगळी जागा म्हाडाच्या नावे करण्यात आली. पैसे भरून विकत घेतलेली जमीन आणि त्यावर बांधलेली घर ही एका मिनिटात म्हाडाच्या मालकीची झाली याविरोधातच या सोसायटीच्या रहिवाश्यांचा गेली पाच वर्ष लढा सुरू आहे. पण त्यांना म्हाडा,पुणे मनपा इथले नेते-मंत्री कुणीच प्रतिसाद देत नाहीये. न्यायालयातल्या खटल्यांच्या तारखा सुरु आहे. तोवर इथं म्हाडाने बांधकाम करायला सुरुवात ही केलीये. नागरिकांचा विरोध ना जुमानता १९८१ पासून जमिनीच्या मालकीची डीम्ड कन्व्हेयन्स करून देण्याची मागणी पूर्ण न करता ही जमीन म्हाडाला हस्तांतरित झालीये. आणि म्हणूनच आता या सोसायटीचे नागरिक निषेध म्हणून पुणे मनपाच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घातला आहे.

सोसायटीने यंत्रणांच्या या मनमानीविरोधात अनेक बाजूनी लढा उभारलंय.मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक प्रत्येक लोकप्रतिनिधींपर्यंत,कनिष्ठ न्यायालयापासून ते उच्च न्यायालयापर्यंत सगळीकडे या समस्येची दाद या नागरिकांनी मागितलीये मात्र आश्वासनाशिवाय त्यांना फार काही मिळालं नाहीये न्याय तर नाहीच नाही.. सोसायटीतल्या मैदानांचा ताबा घेऊन म्हाडाने तिथे इमारती बांधल्यात त्यामुळे इथल्या चिमुरड्याना खेळायला जागा ही शिल्लक नाही. चाळीस वर्षांपूर्वी उभारलेल्या या सोसायटीच्या नागरिकांना खरेदी केलेल्या घरांमध्ये भाड्याने राहा म्हणून नोटीस बजावण्यात आल्यात त्यामुळे हे नागरिक या व्यवस्थेवर काय म्हणून विश्वास ठेवायचा अशी विचारणा करत आहेत.

लोकशाहीच्या या उत्सवातून मतदार हे कुठल्याही कारणाने बाहेर पडत असतील त्यावर बहिष्कार घालत असतील तर हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याला जबाबदार असणाऱ्या नेत्यांनी यंत्रणेने याचा गांभीर्याने विचार करायला हवा.

१०० पन्नास मतांनी काय होणार असा विचार करणाऱ्या यंत्रणेने  नैराश्याची हवा अशीच पसरली तर लोकशाहीचा सांगाडा उद्धवस्त व्हायला फार वेळ लागणार नाही याचा किमान विचार डोक्यात ठेऊन वागायला हवं तरच आदर्श लोकशाही होण्याच्या गप्पा मारता येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2017 08:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close