बैलगाडा शर्यतबंदी होणार का ?

बैलगाडा शर्यतबंदी होणार का ?

  • Share this:

रायचंद शिंदे,जुन्नर

03 फेब्रुवारी : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ग्रामदैवतांच्या यात्रा-जत्रा उत्सव सुरू झाले आहेत. आता यात्रा जत्रा म्हटलं कि घाटात धावणारे बैलगाडे आणि लोकनाट्य तमाशा आलाच...मात्र प्राणिमित्रांच्या मागणी नंतर हायकोर्टाच्या आदेशाने मागील २ वर्षांपासून घाटात धावणारे बैल दिसेनासे झाले आणि यात्रांमधला आत्माच निघून गेल्यात जमा झाला आहे. मागील काही दिवसांपासून तामिळनाडूच्या जलिकट्टू साठी रस्त्यावर उतरलेल्या  समर्थकानंतर आता महाराष्ट्रही बैलगाडा मालक पेटून उठले आहेत. काही ठिकाणी लोकप्रतिनिधींची वक्तव्य तर काही ठिकाणी बैलगाडा मालकांचा आक्रोश उभ्या महाराष्ट्राने या निमिताने पाहिला.

bailgada पुणे जिल्ह्यातील जुन्नर,आंबेगाव, खेड, शिरूर,मावळ तर संगमनेरसह सातारा सांगली जिल्ह्यातली ही उत्सवी परंपरा बंद झाल्याने गावजत्रा ओस पडू लागल्या आहेत. शर्यती बंद झाल्याने बैलांच्या किमती कमालीच्या घटल्या. पण दावणीला बांधलेल्या बैलांना पोसायचं तरी कसं ? अश्या विवंचनेत शेतकरी आहे. मागील दीडशे वर्षांपासून सुरू झालेली ही परंपरा २ वर्षांपासून कोर्टाच्या आदेशाने बंद झालीये. त्यामुळे बैलगाडा मालक कमालीचे संतप्त आहेत.

शर्यतीला धावणारे बैल प्रामुख्याने सांगली, सांगोला,जत, पंढरपूर आदी भागातून लहान वयातच खरेदी केले जातात. आणि शर्यतीसाठी त्यांची चांगली तयारीही केली जाते. खिलार जातीच्या या बैलाची पूर्ण वाढ झाल्यावर मोठी किंमत येत असल्याने अलीकडे अनेक व्यापारी याच व्यवसायात पडले आहेत. मात्र या बैलांना पदरमोड करून सांभाळायचं कसं हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे.

मागील काही दिवसात तर यात्रा जत्रा सोडाच पण पुढां-यांच्या वाढदिवसालाही या शर्यती होऊ लागल्या. घाटात जमणारे बैलगाडा मालक आणि उपस्थित शॉकिनांच्या तोंडी बैल एके बैल हा एकच विषय चर्चिला जात होता. मात्र हायकोर्टाच्या दणक्याने सर्वांच्या तोंडावर नाराजी पसरली आहे.

लोकसभा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्षातील नेत्यांनी आश्वासनं दिली कि सत्तेत आल्यावर शर्यती सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील पण पुढे पुन्हा जैसे थे....बैलगाडा मालक प्राणीमित्र संघटनेच्या विरोधात आंदोलन करताहेत पण न्यायालतात भक्कम पुरावे दिले जात नसल्याने तारीख पे तारीख असच सुरु आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामुळे हा विषय आता पुन्हा रंगू लागला आहे आणि सर्वपक्षीय आंदोलनही होऊ लागलीयेत.तर नेत्यांच्या भाषणबाजीत पुन्हा आश्वासनंच मिळतायेत.

काही  बैलगाडामालक तर आपल्या बैलांवर एवढं प्रेम करतात की, लहानपणापासूbailgada3न घरच्या गाईच्या पोटी जन्मलेल्या बैलाची कधीही  विक्री करत नाहीत. शिवाय मृत्यूनंतर या  बैलाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याचा माणसाप्रमाणेच दशक्रिया विधी करून घरातील सर्वजण मुंडणही करतात. शिवाय या कार्यक्रमाला बैलगाडा प्रेमींना निमंत्रित करून गावजेवणहि दिल जातं. या सर्वांचा  प्राणी मित्रानां एकच सांगावा आहे की, आम्ही आमच्या बैलाचा छळ नाही हो करत.

तामिळनाडूच्या जलिकट्टूसाठी रस्त्यावर उतरलेल्या समर्थकांनी संपूर्ण तामिळनाडू ढवळून निघाला होता. तिथे जल्लीकट्टू सुरू होण्याची चिन्हे आहेत. मात्र महाराष्ट्रातील शर्यतबंदी उठणार, का फक्त निवडणुका आल्यावर चर्चाच होणार. यासाठी राजीनामा देण्याची भाषा करणाऱ्या लोकप्रतिनिधीनी बंदी उठवण्यासाठी एकत्र येऊन कोर्टात आपली बाजू भक्कमपणे मांडने सुद्धा आहे. बैलांचा छळ होतही असेल पण तो सरसकट होत नाही हे जर निदर्शनास आणून दिले तर ही बंदी उठू शकते यासाठी सकारात्मक विचार होण्याची गरज आहे. या आंदोलनाची धग कुठंपर्यंत राहणार, की फक्त चर्चाच होणार हेच पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 10:53 PM IST

ताज्या बातम्या