S M L

'माझं घर,माझा उमेदवार', पुण्यात तिकीटवाटपात घराणेशाही

Sachin Salve | Updated On: Feb 3, 2017 10:08 PM IST

'माझं घर,माझा उमेदवार', पुण्यात तिकीटवाटपात घराणेशाही

हलिमा कुरेशी, पुणे

 

03 फेब्रुवारी : पुण्यात महापालिकेच्या तिकीटवापामध्ये घराणेशाही दिसून आलीय. महापालिकेत आई -मुलगा ,पती-पत्नी  दिर -भावजय  सासरे -सून अशा एकाच घरात तिकीट मिळण्याचा सिलसिला  यावेळीही कायम राहिलाय.


खासदार अनिल शिरोळे यांनी नगरसेवकपदाच्या तिकिटासाठी सिद्धार्थ शिरोळे या आपल्या मुलाला तिकीट दिलंय तर शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी मुलगा सनी निम्हण याला तिकीट दिलं.

पुण्यात वानवडी वॉर्ड नंबर २५ मध्ये महापौर प्रशांत जगताप आणि त्यांची आई रत्नप्रभा जगताप यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळालीय . तर वॉर्ड नंबर २१ कोरेगाव पार्क -घोरपडी  येथून राजेंद्र वागजकर आणि त्यांची पत्नी वनिता वागजकर यांना मनसेतून उमेदवारी मिळालीय. दोघेही विद्यमान नगरसेवक आहेत.

पुण्यात वॉर्ड नंबर २७ कोंढवा खुर्द -मोहम्मदवाडी या प्रभागात  रईस सुंडके आणि हमीदा सुंडके या  दीर -भावजय नेत्यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळालीय. तर राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेवक सुभाष जगताप आणि त्यांची होणारी सून मेघा भिसे यांना तिकीट देण्यात आलंय. वॉर्ड नं. ३५ मधून हे सासरे आणि सून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढणार आहेत.

Loading...
Loading...
Loading...
Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2017 09:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close